अमित शहा यांचे राहुल गांधी यांना चोख उत्तर! नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश कोरोना आणि चीन विरुद्ध दोन्ही लढाया जिंकेल असा ठाम विश्वास
File image of BJP chief Amit Shah | (Photo Credit: IANS)

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कोरोनासमोर (Coronavirus) हात टेकले असे म्हणणाऱ्या राहुल गांधी यांना आज गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीतून चांगलेच उत्तर दिले आहे. काही जण वक्रदृष्टीचे असतात त्यांना प्रत्यके गोष्टीत खोट काढण्याची सवय असते, पण जेव्हा देश संकटात आहेत तेव्हा ही वागणूक योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश कोरोनाविरुद्ध लढाई तर जिंकणार आहेच मात्र चीन (China) सोबत सुरु असणाऱ्या युद्धात देखील आपलाच विजय होणार हे स्पष्ट आहे असे शहा यांनी सांगितले. या सर्व मुद्द्यांवरून राहुल गांधी किंवा अन्य कोणाला चर्चा हवी असेल तर त्यासाठी संसद आहेच, तिथे या, चर्चा होईल आणि 1962 पासून ते आतापर्यंतच्या सर्व मुद्द्यांवर थेट दो-दो हाथ केले जातील पण सध्या देशाच्या संरक्षण यंत्रणेवर दबाव असताना असले मुद्दे काढणे याला काहीच अर्थ नाही असेम्हणत शहा यांनी राहुल गांधी यांना सुनावले आहे. नरेंद्र मोदी शांत आहेत, त्यांनी कोरोना व्हायरस समोर शरणागती पत्करली; राहुल गांधी यांचे ट्विट

ANI ला दिलेल्या मुलाखतीत, अमित शहा यांनी पुढे म्हंटले की, "आपल्या लोकशाहीच्या मुळांवर आक्रमण केल्याचे जर उदाहरण बघायचे असेल तर त्यासाठी इमर्जन्सी कडे पाहावे. कोणत्याही राजकीय कार्यकर्ता किंवा नागरिकाने विसरू नये. याबद्दल जागरूकता निर्माण झाली पाहिजे. ते एखाद्या पक्षाबद्दल नसून देशाच्या लोकशाहीवरील हल्ल्याबद्दल आहे.  इंदिराजी नंतर गांधी घराण्यांमधून कॉंग्रेसचे अध्यक्ष होते का? ते कोणत्या लोकशाहीविषयी बोलतात? आम्ही या संकटकाळात कोणतेच राजकारण करत नाही आहोत मात्र भारतविरोधी प्रचार हाताळण्यास सक्षम आहोत.

ANI ट्विट

जेव्हा एखाद्या मोठ्या पक्षाचे अध्यक्ष (राहुल गांधी) संकटाच्या वेळी 'खालच्या दर्जाची राजनीती' करतात तेव्हा ते दुःखदायक असते. त्यांच्या हॅशटॅगला पाक आणि चीन प्रोत्साहित करत आहेत, याबाबत मी तर त्यांना सल्ला देय शकणार नाही ते काम त्यांच्या पक्षाचे आहे असेही शहा यांनी म्हंटले आहे. India-China Border Tensions: राष्ट्राची रक्षा आणि सुरक्षिततेबाबत कधी बोलणार? राहुल गांधी यांनी ट्वीट करत पुन्हा मोदी सरकारवर साधला निशाणा

ANI ट्विट

दरम्यान, अमित शहा यांनी लॉक डाऊन दरम्यान केंद्र सरकारच्या कामाचा पाढा सुद्धा वाचून दाखवला. जेव्हा मजूर वर्ग संकटात होता तेव्हा केंद्र सरकारने त्यांच्यासाठी घरी जाण्याचे मार्ग उपलब्ध केले, त्यात वेळ गेला पण संकटच मोठे असल्याने त्याला पर्याय नव्हता. या काळात आतापर्यंत 1 कोटी 20 लाख लोकांनी देशभरात प्रवास केला, परराज्यात अडकलेल्या सुमारे अडीच कोटी लोकांची व्यवस्था करण्यात आली होती. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून 11, 000 कोटी रुपये राज्यांना हस्तांतरित करण्यात आले होते असेही त्यांनी सांगितले.