कर्नाटकातील (Karnataka) एका महाविद्यालयातून हिजाबवरून (Hijab) सुरू झालेला वाद आता देशभरातील अनेक राज्यात पोहोचला आहे. दिल्ली आणि मुंबईपर्यंत याचे लोण पसरले आहेत. या मुद्द्यावर राजकारणदेखील चालू आहे. या वादावर देशभरातील नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आता यावर काँग्रेस नेते जमीर अहमद (Zameer Ahmed) यांनी असे वक्त्यव्य केले आहे, ज्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो. काँग्रेस नेते जमीर अहमद म्हणतात की, इस्लाममध्ये हिजाब म्हणजे बुरखा. महिलांचे सौंदर्य लपविण्यासाठी हिजाब घातला जातो. हिजाब न घातल्याने महिलांवर बलात्कार होतात.
इस्लाममध्ये हिजाब अनिवार्य नसल्याच्या केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या विधानाला जमीर अहमद उत्तर देत होते. ते म्हणाले की, हिजाब हे मुलींचे सौंदर्य लपवते. याआधी आरिफ मोहम्मद खान म्हणाले होते की, शीख धर्मातील पगडीप्रमाणे इस्लाममध्ये हिजाब आवश्यक नाही. मुस्लीम मुलींना पुढे जाण्यापासून रोखण्याचे हिजाब हे षडयंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.
#WATCH | Hijab means 'Parda' in Islam...to hide the beauty of women...women get raped when they don't wear Hijab: Congress leader Zameer Ahmed on #HijabRow in Hubli, Karnataka pic.twitter.com/8Ole8wjLQF
— ANI (@ANI) February 13, 2022
देशात हिजाबचा वाद कर्नाटकातील उडुपी येथील महाविद्यालयातून सुरू झाला. इथल्या सहा मुली हिजाब घालून वर्गात आल्या होत्या. या मुलींना हिजाब घालून वर्गात बसू दिले नाही असा कथितरीत्या आरोप होत आहे. त्यानंतर कुंदापूर आणि बिंदूर येथील काही महाविद्यालयांमध्येही अशीच प्रकरणे समोर आली. राज्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालून कॉलेजेस किंवा क्लासेसमध्ये बसू दिले जात नाही.
यानंतर काही विद्यार्थी भगवे गमछे, स्कार्फ आणि साफा परिधान करून महाविद्यालयात येऊ लागले आणि जय श्री रामच्या घोषणा देऊ लागले, त्यानंतर या वादामुळे राजकीय वातावरण तापले. यानंतर देशभरात निदर्शने झाली. परिस्थिती इतकी चिघळली की, कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवावी लागली. (हेही वाचा: Gurgaon: गुडगावमध्ये दिव्यांग महिलेला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला, ट्विट व्हायरल होताच व्यवस्थापनाने मागितली माफी)
दरम्यान, यापूर्वी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी हिजाबच्या वादावर प्रतिक्रिया देताना, ‘माझ्या मुलीने जर म्हटले की मला हिजाब घालायचा आहे तर आम्ही तिला नक्कीच परवानगी देऊ. आम्ही म्हणू, बेटा घाल, बघू तुला कोण अडवते. हिजाब-नकाब घालून मुली कॉलेजात जातील, बिझनेस वूमनही बनतील, एसडीएमही बनतील आणि या देशात एक दिवस मुलगी हिजाब घालून पंतप्रधान बनेल.’