Hidden Camera in Girl's Bathroom in Aligarh: लहान मुलींच्या हॉस्टेल मध्ये वॉर्डन ने बनवले अश्लील व्हीडिओ; बाथरूम मध्ये लावले होते कॅमेरे
Video Shooting | . Representational Image. (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मध्ये एका महिला वॉर्डरने लहान मुलींच्या हॉस्टेलमध्ये मोबाईल कॅमेर्‍यात त्यांचे अश्लील व्हिडिओ  (Objectionable Videos )बनवल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. ही महिला एका सरकारी मुलींच्या हॉस्टेल मध्ये कम करत होती. अलिगढ मधील हे Kasturba Gandhi Balika Vidyalaya होते. ज्य मुलींचे या महिलेने अश्लील व्हिडिओ बनवले आहेत त्या 6वी ते 8वी म्हणजे 14-15 वर्षांच्या आहेत.

टाईम्स ऑफ इंडिया शी बोलताना Mahima Singh, Sub-divisional magistrate यांनी हा प्रकार 5 महिन्यांपूर्वीचा असल्याचं म्हटलं आहे. पालकांच्या तक्रारी आल्यनंतर यावर कारवाई करण्यात आली. तपासामध्ये या महिलेच्या विरूद्ध असलेल्या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचं समोर आलं. त्यानंतर तिच्यावर कारवाई करत तातडीने तिला कामावरून हटवण्यात आले आहे.

वॉर्डनने मुलींचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी तिचा मोबाईल फोन हॉस्टेलच्या बाथरूममध्ये ठेवला होता. रिपोर्टनुसार, ही घटना घडली तेव्हा वसतिगृहात जवळपास 100 मुली राहत होत्या. दुमजली शाळेच्या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाकघर आणि स्नानगृहांसह निवासी सुविधा देखील आहे. Mumbai: 600 हून अधिक महिलांना अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवल्या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हेगाराला अटक .

आरोपीला तिच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आले असताना, अधिका-यांनी तिचे नाव उघड करण्यास नकार दिला कारण शेजारच्या गावातून जास्त मुली येतात. या घटनेच्या काही महिन्यांपूर्वी वॉर्डनवर जातीवाचक टिप्पणी करणे आणि विद्यार्थ्यांना बूट साफ करण्यास भाग पाडणे असे अनेक आरोप करण्यात आले होते.