Kalpana Soren likely to CM Jharkhand: हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटकेच शक्यता, झारखंडच्या मुख्यमंत्रीपदासाठी कल्पना सोरेन यांच्या नावाची चर्चा
Kalpana Hemant Soren | (Photo Credit - Facebook)

झारखंड (Jharkhand) राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) सुरु केलेल्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीला उद्या सामोरे जात आहेत. दरम्यान, त्यांना ईडीने अटक केली तर पुढे काय? हा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातो आहे. या पार्श्वभूमीवर झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाच्या सूत्रांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, हेमंत सोरेन यांना इडीने अटक केली तर त्यांची पत्नी कल्पना सोरेन त्यांच्या भूमिकेत येऊ शकतात. याचाच अर्थ असा की, झारखंड राज्याच्या मुख्यमंत्री पदावर सोरने यांच्या पत्नीच्या रुपात महिला विराजमान झाल्याचे पाहायला मिळू शकते.

कथीत 600 कोटी रुपयांचा मनी लाँड्रिंग घोटाळा

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सरकारी जमीन विकसकांना बेकायदेशीर हस्तांतरण आणि विक्रीचा समावेश असलेल्या 600 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग घोटाळ्याच्या संबंधात अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशीला सामोरे जावे लागत आहे. माजी आयएएस अधिकारी छवी रंजन यांसारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह 14 जणांची यापूर्वीच चौकशी सुरु आहे. त्यामुळे आता सोरेन यांनाही अटक होते की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, आपण कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही. आपणल्याविरुद्ध षड्यंत्र रचले जात आहे, असा आरोप हेमंत सोरेन यांनी केला आहे. (हेही वाचा, Jharkhand CM Hemant Soren: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अचानक गायब? ईडीकडून शोध सुरु)

Kalpana Hemant Soren
Kalpana Hemant Soren | (Photo Credit - Facebook)

सत्ताधारी आघाडीतील आमदारांसोबतच्या महत्त्वपूर्ण बैठकीत, मुख्यमंत्री सोरेन यांनी संभाव्य उत्तराधिकारी म्हणून त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांना परिस्थितीची गरज म्हणून निवडण्याचे सूतोवाच केले आहे. काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे राज्याचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दर्शविला आणि प्रतिकूल परिस्थितीत युतीची एकजूट कायम राहिल असे म्हटले. (हेही वाचा, Hemant Soren ED Interrogation: मनी लाँड्रिंग प्रकरणात हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी)

कल्पना सोरेन यांच्या राजकीय पदार्पणास घटनात्मक अडथळा?

दरम्यान, काही राजकीय आणि घटानत्मक गुंतागुंती श्रीमती सोरेन यांच्या पदार्पणात महत्त्वाचा अडथळा निर्माण करु शकतात. विधानसभेची मुदत वर्षभरात संपुष्टात आल्यास पोटनिवडणुका घेता येणार नाहीत, ज्यामुळे सत्तेच्या संक्रमणाची संभाव्य गुंतागुंत होऊ शकते. झारखंडच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये नियोजित असल्याने, श्रीमती सोरेन यांची पदभार स्वीकारण्याबाबत कायदेशीरता अनिश्चित आहे. अंदाज व्यक्त केला जात आहे की, सोरेन यांना अटक झाल्यास आणि त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते.

Kalpana Hemant Soren
Kalpana Hemant Soren | (Photo Credit - Facebook)

दरम्यान, हेमंत सोरेन यांच्या ऐवजी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवावे की नाही याबाबत सोरेन कुटुंबातच एकवाक्यता नसल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, हेमंत सोरेन भाभी सीता सोरेन आणि भाऊ वसंत सोरेन, कल्पना सोरेन यांच्या नावासाठी सहमत नाहीत. सीता सोरेन JMM येथून आमदार आहेत आणि त्या हेमंत सोरेन बंधू दिवंगत दुर्गा सोरे यांच्या पत्नी आहेत. वसंत सोरेन हेमंत यांचे छोटे बंधू आहेत.