Unseasonal Rain प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - ANI)

Weather Update In India: देशात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) कोसळणार आहे. दिल्ली एनसीआर आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये तीव्र वादळ आणि मुसळधार पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवारी अवकाळी पावसाबाबत अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आयएमडीच्या मते, पूर्व राजस्थानपासून पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बिहारपर्यंत विजांसह जोरदार वारे वाहत आहेत. हे वादळे पश्चिम बंगालकडे सरकत आहे. यामुळे संपूर्ण पट्ट्यात गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काही तासांसाठी दिल्ली एनसीआरमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

7 मे पर्यंत वायव्य भारतात अवकाळी पाऊस -

दरम्यान, 7 मे पर्यंत वायव्य भारतात वादळासह मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहतील. पुढील 4-5 दिवसांत मध्य, पूर्व आणि द्वीपकल्पीय भारतात गडगडाटी वादळे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. 5 ते 8 मे दरम्यान ईशान्य भारतात मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. (हेही वाचा - Weather Update: विदर्भ, उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि कोकणात 4-5 मे रोजी पावसाची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी)

हैदराबाद शहराच्या पावसाच्या हलक्या सरी बरसल्या - 

गेल्या 24 तासांत 'या' राज्यांमध्ये पाऊस -

प्राप्त माहितीनुसार, तेलंगणात काही ठिकाणी 70-100 किमी प्रतितास वेगाने वादळ आले. तथापि, गेल्या 24 तासांत तामिळनाडू, पुद्दुचेरी, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश येथे 40-70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते.