कोविड-19 लसीकरणाच्या (Covid-9 Vaccination) अपॉयमेंट (Appointment) संदर्भात दिशाभूल करणारी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या (Ministry of Health) फेक वेबसाईटवरुन पसरवली जात आहे. ती साईट आता ब्लॉक करण्यात आली आहे. mohfw.xyz या फेक वेबसाईट आज ब्लॉक करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून चौकशीला सुरुवात झाली आहे. लोकांनी अशा फसव्या वेबसाईटपासून सावध राहण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयाने ट्विटद्वारे दिल्या आहेत. ही फेक वेबसाईट आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटप्रमाणे हुबेहुब बनवण्यत आली होती. mohfw.gov.in ही आरोग्य मंत्रालयाची अधिकृत वेबसाईट आहे.
mohfw.xyz ही वेबसाईट ब्लॉक करण्यात आली आहे, यासंदर्भात गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे कृपया अशा फेक वेबसाईटला बळी पडू नका असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने ट्विटच्या माध्यमातून केले आहे. या फेक वेबसाईटवर कोविड-19 लसीकरणासाठी अपॉयमेंट बुक करण्याचा ऑप्शन दिला जात होता आणि लस देण्यासाठी 4 ते 6 हजार रुपये लोकांकडून घेण्यात येणार होते. (Fact Check: कोविड-19 ची नुकसान भरपाई म्हणून 1.60 कोटी रुपयांचे बक्षीस मिळवण्यासाठी RBI कडून Personal आणि Bank Account डिटेल्सची मागणी? PIB ने सांगितले सत्य)
पहा ट्विट:
The site 'https://t.co/l715QloBwO' has been blocked. A case is registered and investigation taken up.
Please be cautious. Do not fall prey to such fraudulent websites.@PMOIndia @drharshvardhan @AshwiniKChoubey @PIBFactCheck @mygovindia @DDNewslive https://t.co/g6Efori7tq
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) February 12, 2021
ही फेक वेबसाईट लेआऊट, रंगसंगती, कन्टेंट त्याचबरोबर इतर बाबी पुर्णत: आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट प्रमाणे असल्याने लोकांचा पूरता गोंधळ उडाला होता. मात्र पीआयबी फॅक्ट चेकने यामागील सत्यचा उलघडा केला आणि त्यानंतर आज ती साईट बंद करण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.