Hathras Gangrape Case: सीबीआयकडून गुन्हा दाखल, तपासासाठी बनवली टीम
हाथरस प्रकरणातील पीडितेचे कुटुंब (Photo Credits: Twitter)

उत्तर प्रदेशातील हाथरस मधील सामूहिक बलात्कार प्रकरणी सीबीआयकडून रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 19 वर्षीय मुलीसोबत काही नराधांमांनी मिळून बलात्कार करत तिला मृत्यूच्या दारात उभे केले. याच कारणास्तव सीबीआयने पीडितेच्या भावाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. ज्यामध्ये असा आरोप लावण्यात आला आहे की, एका आरोपीने 14 सप्टेंबर रोजी शेतात त्याच्या बहिणाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. सीबीआयने या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी एक टीम तयार केली आहे.(Crimes Against Women: महिलांवरील वाढत्या अत्याचाराला चाप बसवण्यासाठी गृह मंत्रालयाने जारी केली नवी नियमावली)

हाथरस मधील घटनेचा तपास यापूर्वी उत्तर प्रदेशातील पोलिसांकडून केला जात होता. पण आता सीबीआयने स्वत:च्या जबाबदारीवर उत्तर प्रदेशातील सरकारला आग्रह केल्यानंतर केंद्र सरकारच्या अधिसुचनेनंतर हे प्रकरण आपल्या हाती घेतले आहे. या प्रकरणाचा कसून तपास करण्यासाठी एक विशेष टीम त्यासाठी काम करणार आहे.(Rape Post Explaining Procedure Goes Viral: महिलेवर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार कसा करावा? हे सांगणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल; पोलीस तपास सुरु)

पीडितेच्या भावाने हाथरस मधील चंदपा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारकर्त्याने असा आरोप लावला आहे की, 14 सप्टेंबर रोजी आरोपीने बहिणाचा गळा दाबून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेला जवळजवळ 27 दिवस झाले आहेत. यापूर्वी हाथरस पोलीस, त्यानंतर एसआयटी आणि आता सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.

पीडितेचा 29 सप्टेंबर रोजी दिल्लीतील एका रुग्णालयात मृत्यू झाला. या मुलीवर चार जणांनी बलात्कार केला. या प्रकरणात हाथरस पोलिसांनी शव परिवाराला न देता जाळल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याच कारणास्तव उत्तर प्रदेशातील सरकारवर जोरदार टीका केली गेली. तसेच देशभरातून हाथरस प्रकरणाच्या विरोधात संताप व्यक्त केला गेला.