Haryana: हरियाणातील जींद कोर्टाच्या परिसरात झालेल्या वादात एका महिलेला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन खाली फेकल्याची धक्कादायक घडना घडली आहे. या घटनेत सदर महिलेची प्रकृती गंभीर असून 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार हुंड्यावरुन झाला आणि त्याची सुनावणी कोर्टात सुरु आहे.(Shocking! 11 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म; आरोपी फरार, बलात्काराचा गुन्हा दाखल)
खरंतर, 2017 मध्ये सुरेशने शम्मी हिच्या सोबत लग्न केले होते. परंतु लग्नाच्या काही महिन्यानंतर हुंड्यावरुन वाद झाला आणि नवरा-बायकोच्या नात्यात फूट पडली. हे प्रकरण ऐवढे वाढले की, अखेर कोर्टात धाव घ्यावी लागली. जेव्हा कोर्टात दोन्ही बाजूचे लोक आले तेव्हा सुरेशची बहिण सीमा हिला कोर्टाच्या पहिल्या मजल्यावरुन ढकलले.
सदर घटना अशावेळी घडली जेव्हा सुरेश आणि त्याची बहिण सीमा हे वकिलांसोबत चेंबरमध्ये उभे होते. परंतु तेव्हाच वरच्या मजल्यावरुन जोरात आवाज आला. आरोप असा आहे की, शम्मीच्या परिवाराने नवऱ्याच्या नातेवाईकांवर हल्ला केला. हे कळताच सीमा लगेच पहिल्या मजल्यावर गेली आणि तेथे शम्मीसह तिच्या परिवारासोबत तिचे वाद झाले.(Shocking! प्रॅक्टिकल परीक्षेच्या बहाण्याने दहावीमधील 17 मुलींचे अंमली पदार्थ देऊन लैंगिक शोषण; शाळा संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल)
तक्रारीत असे म्हटले आहे की, शम्मी हिने सीमाचे केस पकडले. दुसऱ्या सदस्यांनी हात-पाय पकडून तिला खाली फेकण्याचा प्रयत्न केला. तक्रारकर्त्यांनुसार, शम्मी आणित तिच्या परिवाराने सीमा हिला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन खाली ढकलले.