गर्भवती बायकोला जिवंत जाळण्याचा नवऱ्याचा प्रयत्न, काही महिन्यांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील तरुणीवर रात्रीच्या वेळेस ती झोपली असता तिच्यावर पेट्रोल टाकून आग लावली. सोनीपतीच्या कुंडली मध्ये दोन वर्ष तो या तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता. परंतु तरुणी गर्भवती असल्याने तिच्यासोबत त्याने चार महिन्यांपूर्वी लग्न केले. ज्यावेळी नवऱ्याने तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला असता त्याला सुद्धा तिने आगीत खेचून घेतले. यामुळे नवरा सुद्धा 30 टक्के भाजला गेला आहे. तर तरुणी ही 95 टक्के भाजली असून तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल केले आहे. तर तरुणीने रविवारी एका मुलाला जन्म दिल्यानंतर त्याच्या काही वेळाने मृत्यू झाला. पोलिसांनी तरुणीचे सांगितलेल्या घटनेबद्दल तरुणाच्या आईसह त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुंडली पोलिसांनी माहिती मिळाली होती की, एक तरुणीला आणि तरुण भाजल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. तेव्हा पोलीस रुग्णालयात दाखल होत त्या दोघांना पाहिले. तेव्हा भाजलेल्या अवस्थेतील मुलगी ही 20 वर्षाची असल्याचे कळले.(Uttar Pradesh Shocking: भूतबाधा झाल्याचे सांगत मांत्रिकाचे तरूणीसोबत धक्कादायक कृत्य, उत्तर प्रदेश येथील घटना)

प्रगती हिने पोलिसांना सांगितले की, ती उत्तर प्रदेशातील शामली गावात राहणारी आहे. तर दोन वर्षांपासून ती सोनीपत जिल्ह्यातील कुंडलीच्या राहुल याच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहत होती. याच दरम्यान ती गर्भवती राहिली होती. त्याचसोबत राहुल आणि त्याची आई तिला सातत्याने त्रास देत होते. तर मुल होऊ न देण्यासाठी तिच्यावर वारंवार दबाव टाकला जात होता. त्याचसोबत तिला गर्भपात करण्यासाठी सुद्धा सांगितले जात होते. परंतु तिने यासाठी नकार दिला. याच कारणावरुन शनिवारी रात्री राहुलने प्रगती हिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, प्रगती हिच्या सांगण्यावरुन पोलिसांनी आता राहुल याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरुणीची प्रकृती अद्याप गंभीर आहे. तर प्रियकराची तब्येत ठिक असल्याचे सांगण्यात आले आहे.