Hanuman Jayanti | File Image

आठवडाभरापूर्वी झालेल्या राम नवमी (Ram Navami) दिवशी भारतात अनेक राज्यांमध्ये श्रीराम नवमी दिवशी राडे झाले होते. त्यानंतर आता 6 एप्रिलला साजर्‍या होणार्‍या हनुमान जयंती (Hanuman Jayanti)  दिवशी गोंधळ आणि तणाव टाळण्यासाठी आता केंद्र सरकारकडूनच नियमावली जारी करण्यात आली आहे. केंद्राने सार्‍या राज्यांना आणी केंद्रशासित प्रदेशांना कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी नियमावली जारी केली आहे. हनुमान जयंतीचा उत्सव शांततापूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समाजात या सणाच्या सेलिब्रेशनला गालबोट लागू नये काळजी घेतली जात आहे.

गृह मंत्रालयाकडून ट्वीट करत सार्‍या राज्यांनी आणि केंद्र शासित प्रएशांनी राज्यातील कायदा व सुवस्था, शांतता अबाधित ठेवण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन केले आहे. या सणाच्या दिवसात कोठेही दंगली पेटण्यास कारणीभूत घटना घडू नये याची काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात आलं आहे. नक्की वाचा: Hanuman Jayanti 2023 Bhog Items: हनुमान जयंतीनिमित्त बनवा हे खास पदार्थ, पाहा व्हिडीओ .

पहा ट्वीट

राम नवमी नंतर आठवडाभराने हनुमान जयंती साजरी करतात. रामाचा भक्त हनुमान याचा जन्म हिंदू कॅलेंडर नुसार, चैत्र पौर्णिमेदिवशी साजरा केला जातो. हा दिवस हनुमान जयंतीचा असतो. त्यामुळे यंदा ग्रॅगेरियन कॅलेंडरनुसार 6 एप्रिलला साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने मारूती मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो.