
गुवाहाटीमध्ये एक धक्कादायक हत्या प्रकरण समोर आले आहे. येथे एका 10 वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. त्याचा मृतदेह झुडपात सुटकेसमध्ये धक्कादायक स्थितीत आढळून आला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पीडित मुलाच्या आईच्या प्रियकराने हत्या केल्याचा आरोप आहे. संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि आईचीसुद्धा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पीडित मुलाची आई असलेल्या संबंधित महिलेने पोलिसांत शनिवारी तक्रार दाखल केली होती की, तिचा मुलगा ट्युशनला गेल्यानंतर घरी परत आला नाही. त्यानंतर पोलीस तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान असे समोर आले की, संबंधित महिला तिच्या पतीपासून वेगळी राहत असून तिचे जितुमोनी हलोई नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. पोलिसांनी हलोईला ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि मृतदेह ठेवलेले ठिकाण दाखवले.
शहराच्या बाहेरील भागात एका झाडीच्या परिसरात सूटकेस आढळून आला, ज्यामध्ये मुलाचा मृतदेह सापडला. या घटनेने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी जितुमोनी हलोईला अटक केली असून, मुलाची आईही पोलिसांच्या ताब्यात आहे आणि तिची चौकशी सुरू आहे.
मुलाचा वडील, जो सध्या त्या महिलेसोबत राहत नाही, त्यानेही पोलिसांसमोर आपला बयान नोंदवले आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.