Gurugram Shocker: डेटिंग ॲपवरुन ओळख झालेल्या पुरुषाचा महिलेवर बलात्कार
Rape Stope | Representational Image (Photo Credits: File Image)

गुरुग्राम (Gurugram) येथील सेक्टर 50 भागातील एका हॉटेलमध्ये डेटिंग ॲपवर (Dating App) भेटलेल्या पुरुषाने आणि त्याच्या मित्राने एका महिलेवर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेनंतर सेक्टर 50 पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराच्या कलमाखाली दोन अज्ञात आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, एसएचओ प्रवीण मलिक यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.  (हेही वाचा - Palghar Shocker: आदिवसी महिलेवर शेतकमालकाचा बलात्कार, पालघर येथील घटना)

पीडितेच्या तक्रारीनुसार, ती एका डेटिंग अॅपद्वारे आरोपीला भेटली ज्याने नंतर तिला 29 जून रोजी हॉटेलमध्ये बोलावले, असे पोलिसांनी सांगितले. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर त्या दोघांनी तिला जेवण दिले आणि ते खाल्ल्यानंतर ती बेशुद्ध झाली, असा आरोप तिने केला. “याचा फायदा घेत त्यांनी माझ्यावर बलात्कार केला आणि या कृत्याचा व्हिडिओही बनवला. शुद्धीवर आल्यानंतर मी विरोध केला असता आरोपीने तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. कसा तरी मी घरी परतले पण आता पोलिसात पोहोचले,” तिने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान आता पिडीतेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आता पुढील तपास हा सुरु केला असून त्यांच्या वर्णनावरुन आरोपींचा शोध हा घेतला जात आहे. सध्या डेटिंग ॲपच्या वरुन होणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून यामुळे पोलिसांची डोकेदुखी देखील वाढली आहे.