Guru Nanak Jayanti 2020: गुरु नानक जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी, अजित पवार यांच्यासह 'या' नेत्यांनी गुरुंना वाहिली आदरांजली
File image of Rahul Ga ndhi and Prime Minister Narendra Modi| (Photo Credits: PTI)

Guru Nanak Jayanti 2020: आज देशभरात कार्तिक पौर्णिमेसह शीख धर्मियांचे गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरु नानक यांची 551 वी जयंती सर्वत्र साजरी केली जात आहे. शीख धर्मियांसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि खास मानला जातो. याच पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह अन्य काही नेत्यांनी गुरु नानक जयंती निमित्त शीख धर्मियांच्या गुरुंना ट्वीट करत आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु नानक जयंती निमित्त ट्वीट करत असे म्हटले आहे की, श्री गुरु नानक देव जी यांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन. त्यांचे विचार आम्हाला समाजाची सेवा  आणि उत्तम भुमीसाठी प्रेरित करत राहू द्या.(Guru Nanak Jayanti 2020: गुरु नानक जयंती निमित्त GIF Greetings, HD Images, WhatsApp Stickers, Wallpapers, Photos Messages पाठवून तुमचे नातेवाईक आणि मित्र-परिवारांना द्या या खास शुभेच्छा)

 Tweet:

अतिम शहा यांनी ट्वीट मध्ये म्हटले की, सर्व देशवासियांना श्री गुरु नानक देव जी यांच्या 551 व्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा. गुरु नानक यांचे विचार आम्हाला नेहमीच धर्म आणि राष्ट्रहिताच्या मार्गावर चालण्यासाठी शक्ती देऊ देत.

 Tweet:

अजित पवार यांनी ट्वीट मध्ये लिहिले आहे की, आपल्या विचारांनी समाज परिवर्तन करणाऱ्या, आपले संपूर्ण आयुष्य लोकांच्या हितासाठी समर्पित करणाऱ्या शीख धर्मियांचे संस्थापक, शीखांचे पहिले गुरु, गुरु नानक देव जी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

 Tweet:

राहुल गांधी यांनी गुरु नानक जयंती निमित्त ट्वीट करत म्हटले की, अहंकारापासून दूर, सत्य आणि बंधुभावाची शिकवणाऱ्या देणाऱ्या गुरु नानक देव जी यांना माझ्याकडून वंदन. गुरु नानक जयंती निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

 Tweet:

सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हटले की, मानवी मूल्ये, प्रेम आणि भक्तीभावाची शिकवण देऊन शीख धर्माची स्थापना करणारे गुरु नानक यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

 Tweet:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजिक कार्यक्रम रद्द किंवा लॉकडाऊनच्या निर्बंधांखाली साजरे करण्यात आली आहेत. यामुळे शीख समुदायदेखील यावर्षी गुरु नानक यांची जयंती अपापल्या घरातच साजरी करणार आहेत.