डेरा सच्चा सौदा प्रमुख Gurmeet Ram Rahim शेती करण्यासाठी तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता; कारागृह अधिकक्षकांकडे केला पॅरोल रजेसाठी अर्ज
Gurmeet Ram Rahim | (Photo Credits: ANI)

बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची सजा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदा (Dera Sacha Sauda) प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम सिंह (Baba Gurmeet Ram Rahim Singh) हा कारागृहाबाहेर येण्याची शक्यता आहे. गुरमीत राम रहीम याने कारागृह अधिकक्षक यांच्याकडे 42 दिवस पॅरोल (Parole) रजा मिळावी यासाठी अर्ज केला आहे. हा अर्ज आल्यानंतर कारागृह अधिकक्षकांनी सिरसा जिल्हा प्रशासनाला पत्र लिहीले आहे. या पत्रात अधिक्षकांनी गुरमीत राम रहीम यांच्याबाबत अहवाल घेतला आहे.

हरियाणा सरकारचे मंत्री के एल पंवार यांनीही म्हटले आहे की, सर्व कैद्यांना सजा सुनावल्यानंतर दोन वर्षांनी पॅरोल रजेचा हक्क प्राप्त असल्याचे मानले जाते. एखाद्या कैद्याचे कारागृहातील वर्तन चांगले असेल तर, कारागृह प्रशासन एक अहवाल तरायर करते. यावर कमिशन अंतिम निर्णय घेतात.

अधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह याने हरियाणा राज्यातील सिरसा येथे शेती करण्यासाठी एक महिन्यापेक्षाही अधिक काळासाठी पॅरोल रजा मागितली आहे. 51 वर्षीय गुरमीत राम रहीम हा बलात्काराच्या दोन प्रकरणात आणि एका पत्रकाराच्या हत्या प्रकरणात दोषी आढळला आहे. या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठविण्यात आली आहे. तेव्हापासून तो रोहतक येथील सुनरिया कारागृहात सजा भोगत आहे. (हेही वाचा, गुरमीत राम रहीम: जामीन मिळाला पण, रवानगी तुरुंगातच)

गुरमीत राम रहीमय याने 42 दिसांसाठी पॅरोल रजा अर्ज दाखल केल्यानंतर कारागृह अधिकक्षकांनी सिरसा जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिले आहे. 18 जून रोजी लिहिलेल्या या पत्रामध्ये अधिकाऱ्यांनी गुरमीत याला रजा देणे शक्य आहे किंवा नाही याबाबत विचारणार करण्यात आली आहे. दरम्यान, जेल अधिकक्षकांनी कमिशनरला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गुरमीत राम रहीम याचे कारागृहातील वर्तन चांगले राहिले आहे. त्याने कोणत्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन केले नाही.

दरम्यान सिरसा पोलिसांनाही हे पत्र मिळाले असून, पोलिसांनी महसूल विभागाला म्हटले आहे की, सिरसा येथे गुरमीत राम रहीम याची किती जमीन आहे याबाबत माहिती द्यावी.