Photo Credit- X

DLF Camellias Penthouse: गुरुग्राममधील डीएलएफ कैमलियास (DLF Camellias) इथे एक प्लॅट 190 कोटींना विकला गेला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात महागडा उच्चभ्रू कॉन्डोमिनियम करार असल्याचा मानला जात आहे. या 16,290 चौरस फुटांच्या पेंटहाऊसने केवळ एनसीआरमध्येच नव्हे तर भारतातही प्रति चौरस फूट किंमतीच्या बाबतीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. (हेही वाचा:Birds React to Earthquake: अचानक 7.0 तीव्रतेच्या भूकंप आला अन् पक्षांचा थवा हवेत उडाला; कॅलिफोर्नियातील भूकंपाची दृश्य (Watch Video))

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रिअल इस्टेट डेटा ॲनालिटिक्स फर्म प्रोपक्विटीचे सीईओ समीर जसूजा यांनी सांगितले की, कारण दिल्ली-एनसीआरमध्ये प्लॅटच्या किमती एरियाच्या आधारावर ठरतात. तर मुंबईत चौरस फूट क्षेत्रफळाच्या आधारावर किमती ठरवल्या जातात.

याआधी सर्वात महागडी डील 1.4 लाख रुपये प्रति स्क्वेअर फूट होती

यापूर्वी सर्वात महागडी डील ही मुंबईतली ठरली होती. मुंबईतील लोढा मलबारमधील तीन अपार्टमेंट 263 कोटींना विकले गेले होते. ज्याची किंमत 1.4 लाख प्रति चौरस फूट होती. हा सर्वात महागडा करार मानला जात होता. रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म जेएलएलच्या मते, दिल्ली-एनसीआरने 2024 च्या पहिल्या सहामाहीत लक्झरी निवासी लॉन्चमध्ये 64% वाटा मिळवला आहे. यावरून असे दिसून येते की अल्ट्रा-लक्झरी प्रॉपर्टी मार्केटमध्ये या क्षेत्राची मागणी सातत्याने वाढत आहे.

सर्वात महागडा रिअल इस्टेट प्रकल्प गुरुग्राममध्येच

देशातील सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी डीएलएफ लवकरच गुरुग्राममधील गोल्फ कोर्स रोडवर देशातील सर्वात महागडा प्रकल्प “डीएलएफ द दहलियास” लॉन्च करणार आहे. हा प्रकल्प आधीपासून अस्तित्वात असलेल्या आयकॉनिक “द कॅमेलिया” च्या समोर असेल. दहलिया 17 एकरात पसरणार असून, त्यात 29 मजली टॉवर्स असतील. या टॉवर्समध्ये 400 सुपर लक्झरी निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. या निवासस्थानांचा आकार 9,500 ते 16,000 चौरस फूट दरम्यान असेल, तर सरासरी आकार 11,000 चौरस फूट असेल. या प्रकल्पाचे क्लबहाऊस सुमारे 2 लाख स्क्वेअर फूट असेल, जे कॅमेलियाच्या क्लबहाऊसच्या दुप्पट असेल.