Husband Wife and Second Marriage: जमीन विकून बायकोवर डाव लावला; तिने परदेशातच नवा नवरा शोधला; भारतातील पतीकडून पोलीसात तक्रार
Relation Breakup | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Punjab Wife Got Married Second Time: घरदार, जमीन जुमला विकून मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवावे आणि पुन्हा त्यांनी फिरकून मागेही पाहू नये. तिथेच एखादी नोकरी आणि छोकरी शोधून तिथेच स्थायीक व्हावे. इकडे खाचा झालेल्या डोळ्यांनी आणि हलणारी मान घेऊन वार्धक्यातील जीवन जगणारे आईवडील वर्षानुवर्षे आपल्या मुलांची वाट पाहात राहावेत, अशी कहाणी आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिली असेल. अशीच प्रत्यक्ष घटना पंजाब (Punjab) राज्यात घडली आहे. आगोदरच शिकलेल्या पत्नीला आणखी उच्च शिक्षण घेण्यासाठी पतीने चक्क वडीलोपार्जीत जमीन विकून विदेशात पाठवले. पण, घडले भलतेच. बायकोवर लावलेला इतका मोठा डाव पतीवरच उलटला. विदेशात शिक्षणासाठी गेलेल्या पत्नीने चक्क तिथेच एक नवा जोडीदार पाहिला आणि त्याच्यासोबत लग्न करुन ती तिथेच राहू लागली. इकडे पती मात्र पत्नी (Husband Wife Relation) भारतात केव्हा येणार याबाबत वाट पाहू थकला आहे.

शैक्षणीक खर्चासाठी विकली वडिलोपार्जीत जमीन

घटना आहे पंजाब राज्यातील बटाला येथील जवळच्या गावातील. या गावातील हरमिंदर सिंह यांनी आपल्या पत्नीला पुढील शिक्षणासाठी कॅनडाला पाठवले. त्यासाठी आवश्यक खर्चासाठी पैसे उभारण्यासाठी त्यांनी स्वत:चे घर आणि वडिलोपार्जीत जमीन विकली. या विक्रीतून आलेल्या पैशातून त्यांनी आपल्या पत्नीला विदेशात शिक्षणासाठी पाठवले. पती पत्नीमध्ये ठरले होते की, तिने पुढे जाऊन शिक्षण पूर्ण करायचे आणि तिथे नोकरी मिळवायची. त्यानंतर पतीलाही भारतातून तिकडे बोलावून घ्यायचे. पण घडले उलटेच. (हेही वाचा, Woman Bites Husband: बायकोने रागाच्या भरात तोडला नवऱ्याच्या कानाचा लचका, दिल्ली पोलिसांकडून कारवाई)

कॅनडात रमली, संसार आणि सासरच विसरली

पत्नी शिक्षणासाठी कॅनडाला तर गेली. तिथे तिने आपले शिक्षण पूर्ण केले. मात्र, पतीला तिकडे बोलावलेच नाही. सुरुवातीला पतीनेही फार लक्ष दिले नाही. पण हळूहळ तिने भारतातील आणि गवाकडील संपर्कच कमी केला. पहिल्यासारखे फोन, ईमेल अथवा इतर संपर्क काहीच नाही. त्यामुळे संशय वाढू लागला. उज्ज्वल भविष्यासाठी आखलेली योजना अंगलट आल्याची भावना पती हरमिंदर सिंह यांच्या मनात निर्माण झाली. (हेही वाचा, HC On Wife Refusal Of Sex: 'पत्नीने पतीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देणे ही क्रूरता', उच्च न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट)

पती आणि कुटुंंबीयंचे फोन नंबर ब्लॉक

प्रदीर्घ काळ वाट पाहूनही कोणत्याही प्रकारचा संपर्क पत्नीने केला नाही. त्यामुळे अखेर पती हरमिंदर सिंह यांनी एसएसपी ऑफीसमध्ये जाऊन पोलीस आणि उच्चाधिकाऱ्यांकडे पत्नीविरोधात तक्रार दिली. प्रकरणाची माहिती देताना पती हरमिंदर सिंह यांनी सांगितले की, त्यांचा विवाह 12 वर्षांपूर्वी बाटला जिल्ह्यातील गावात राहणाऱ्या एका मुलीसोबत झाला होा. दोघेही एकत्रच शिक्षण घेत होते. दोघांच्याही पूर्वपरवानगीने हा विवाह ठरला होता. विवाह झाल्यावर पत्नीची विदेशी शिक्षणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी हरमिंदर यांनी वडिलोपार्जीत जमीनीचा सौदा केला आणि निधी उभारला. पत्नी विदेशात जाऊन शिक्षण घेत राहिली. पती इकडे शिक्षणाचा खर्च उचलत राहिला. (हेही वाचा, Karnataka Shocker: चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला 12 वर्षे घरात डांबून ठेवले; पोलिसांकडून सुटका, म्हैसूरमधील धक्कादायक घटना)

कुटुंबीयांच्या संमतीने गर्भपात

पत्नी सातत्याने पतीला आश्वासन देत राहिली की, ती त्याला कॅनडाला बोलावेन. पण तसे कधीच घडले नाही. पतीनेच कॅनडाला जाण्यासाठी दोन तीन वेळा अर्ज केला पण काही कारणामुळे त्यांना विजा मिळू शकला नाही. पती हरिमंदर सिंह यांनी सांगितले की, कॅनडाला जाऊन पत्नी एकदा परत आली. ती परत गेली तेव्हा ती गर्भवती होती. पण, कॅनडाला जाऊन तिने आपल्या कुटुंबाच्या संमतीने गर्भपात केला. कॅनडात राहणाऱ्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार, आता तिने तिकडे नुकताच विवाह केला आहे.

भारतातून हरमींदर आणि त्याचे कुटुंबीय तिच्याशी संपर्क करत असतात पण सर्वांचेच फोन क्रमांक तिने ब्लॉक केले आहेत. तिने पती आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. पती हरमिंदर याची आई सांगते की, माझा मुलगा 12 वर्षांपासून कॅनडाला जाण्यासाठी वाट पाहतो आहे. पण, तिने त्याला फसवले. त्याच्या मनाला प्रचंड यातना दिल्या. दरम्यान, प्रकरण पोलिसांमध्ये पोहोचले असून, प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा नोंद झाला आहे. आता पतीकडील मंडळी न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.