बायको गर्भवती असल्याने शारीरिक संबंध थांबले; Sex साठी चटावलेल्या नराधमाचा 3 अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीची हत्या
Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

पत्नी गर्भवती राहिल्याने शरीरसंबंधावर मर्यादा आल्याने एका नराधम व्यक्तीने तीन अल्पवयीन मुलींना आपल्या वासनेची शिकार बनवले. हा नराधम इतक्यावरच थांबला नाही.  तीन मुलींवर बलात्कार (Rape)  केल्यानंतर त्याने त्यातील एकीची हत्याही केली. विजय ठाकूर असे या नराधमाचे नाव असून तो 26 वर्षांचा आहे. त्याचे म्हणणे आहे की, त्याची पत्नी गर्भवती असल्याने तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेऊ शकत नव्हता, त्यामुळे त्याने अल्पवयीन मुलींना सेक्ससाठी टार्गेट केले. या मुलींची वये 7 वर्षे, 5 वर्षे व 3 वर्षे अशी आहेत.

अशा लहान मुली आपल्याला विरोध करू शकणार नाहीत तसेच घडलेली घटना कोणाला सांगू शकणार नाहीत म्हणून त्याने लहान मुलींना वासनेचे शिकार बनवले. विजयने सांगितले की, त्याने आधी सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. ही मुलगी तिच्यासोबत घडलेली घटना कोणाला सांगू शकली नाही, त्यामुळे त्याने अशाच लहान मुलींना शोधायला सुरुवात केली. याद्वारे आपल्याला सेक्सपण मिळेल आणि याची कोणाला माहितीही मिळणार नाही असे त्याला वाटले.

मिळालेल्या माहितीनुसार, एक मुलगी कचरा उचलत असताना आरोपीने तिला कपडे देण्याचे आमिष दाखवून सोबत नेले आणि तिच्याशी गैरवर्तन केले. दुसरी मुलगी मोबाईलशी खेळत होती, त्यादरम्यान विजयने तिचा मोबाईल हिसकावून घेतला, त्यामुळे ती त्याच्या मागे गेली आणि आरोपीने तिला स्वतःच्या क्रूरतेची शिकार बनवले. तिसरी 3 वर्षांची मुलगी आपल्या कुटुंबासोबत झोपली असताना आरोपीने तिला उचलून नेले. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली.

गांधीनगर रेंजचे आयजी अभय चुडासामा यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले की, एकापाठोपाठ घडलेल्या तीन क्रूर घटना पाहता, गांधीनगर जिल्हा पोलिसांची अनेक पथके आरोपीच्या शोधासाठी तैनात होती. संशयाचे प्राथमिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विजय ठाकोर नावाच्या आरोपीला पकडण्यात आले. चौकशी केल्यानंतर आणि काही पुरावे हाती लागल्यावर विजयनेच हे कृत्य केल्याचे समोर आले, त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 11 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (हेही वाचा: Madhya Pradesh: पत्नीने टॉवेल देण्यास उशीर केल्याने संतापलेल्या पतीने डोक्यात घातले फावडे, मृत्यू)

पोलिसांनी सांगितले की, विजयला सहा वर्षांची मुलगी असून त्याची पत्नी दुसऱ्यांदा सात महिन्यांची गरोदर आहे. गेल्या 15 दिवसांपासून तो पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवू शकत नव्हता, त्यामुळे अवघ्या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये त्याने तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केले.