Coronavirus: कोरोना व्हायरस संकटापुढे 'Gujarat model' फेल: राहुल गांधी
Rahul Gandhi | (PTI)

वायनाडचे खासदार, काँग्रेस (Congress)पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कोरोना व्हायरस संकटावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या गुजरात मॉडेलवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. देशभरातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना व्हायरस संक्रमनामुळे होणारा मृत्यूदर हा गुजरात (Gujarat) राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे इतर राज्यांशी तुलना करत ‘गुजरात मॉडल’ (Gujarat Model) फेल गेल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. गुजरात राज्यातील तुलना काँग्रेस शासीत राज्यांशी करत राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरना व्हायरस संक्रमित रुग्णांचा मृत्यूदर गुजरातमध्ये 6.25, महाराष्ट्र 3.73%, राजस्थान 2.32%, पंजाब 2.17%, पुडुचेरी 1.98%, झारखंड 0.5% आणि छत्तीसगढ 0.35% इतका आहे''. त्यामुळे या आकडेवारीकडे पाहता कोरोना व्हायरस संकटापुढे 'गुजरात मॉडेल' अयशस्वी झाल्याचे दिसते.

गुजरातच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी कोरोना व्हायरस संक्रमन झालेले 514 नवे रुग्ण आढळले. गुजरातमधील एकूण कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या ही 24,104 इतकी झाल्याची माहिती आहे. (हेही वाचा, भारतात लॉकडाउन पूर्णपणे अपयशी; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका)

दरम्यान, राहुल गांधी यांनी कोरना व्हायरस संक्रमनावरुन निशाणा साधताना केंद्र सरकारवर पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवरुनही टीकास्त्र सोडले आहे. सरकारचे उद्योगपतींशी असलेले साठेलोठे (क्रोनी कैपिटलिस्ट) सर्वसामान्यांना भारी पडत आहे. उद्योजकांना खास सवलत देण्याच्या सरकारच्या धोरणामुळे सर्वसामान्यांना फटका बसत असल्याचेही गांधी यांनी म्हटाले आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक आलेख शेअर केला आहे. ज्यात मे 2014 मध्ये कच्चा तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलर इतक्या होत्या. तरीही देशात पेट्रोलची प्रति लीटर 71 रुपये दराने विकले जात होते. तर वर्तमान स्थिती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती प्रति बॅरल 40 डॉलर इतक्या आहेत. प्रत्यक्षात देशात मात्र पेट्रोल 76 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे, असे म्हटले आहे.