गुजरात मधील एका ज्वेलर्स शॉप मध्ये हिरे जडित मास्क विक्रीसाठी उपलब्ध, किंमत ऐकून तुमचेही डोळे चक्रावतील
Diamond Mask (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) भारतात हाहाकार माजविला असून दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे सोशल डिस्टंसिंग पाळण्यासह मास्क घालणे देखील बंधनकारक झाले आहे. मास्क (Mask) घालणे बंधनकारक असल्याने या मास्कमध्ये काही विविधता आणण्याचे विचार गुजरातमधील (Gujarat) एक ज्वेलर्स शॉपने केला. ज्यामुळे या ज्वेलर्सने हिरे (Diamond) जडित मास्क विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. या मास्क मध्ये अस्सल हिरे, अमेरिकन हिरे आणि सोन्याचा वापर करण्यात आला आहे.

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरात मधील या ज्वेलर्समध्ये आलेल्या एका ग्राहकाने एखादा हटके मास्क बनविण्याची मागणी केली होती. ज्वेलर्स मालकाने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन उठल्यानंतर एका ग्राहकाच्या लग्नसमारंभ होणार होता. तेव्हा त्याने अशा पद्धतीच्या मास्कची मागणी केली होती. त्यावर त्यांच्या कारागिरांनी असा हटके मास्क तयार केला आहे. कोरोना व्हायरस लस किंवा औषध सापडले नाही, तर भारतात फेब्रुवारी 2021 पर्यंत दररोज आढळतील 2.87 लाख रुग्ण - MIT च्या अभ्यासातून खुलासा

या मास्कची किंमत 1.5 लाखापासून सुरु होत असून 4 लाखापर्यंतचे मास्क मिळतील. त्यामुळे त्या ग्राहकाला हा मास्क दिल्यानंतर आम्ही असा मास्क विक्रीसाठी उपलब्ध केला असे या ज्वेलर्स मालकाने ANI शी बोलताना सांगितले. येत्या काही दिवसांत लोकांच्या मागणीनुसार हे मास्क मोठ्या प्रमाणात बनवले जातील.

भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 7,93,802 वर पोहचला आहे. त्यातील 4,95,513 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 2,76,685 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. म्हणजेच या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.