File image of Gujarat CM Vijay Rupani | (Photo Credits: PTI)

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी (Gujarat CM Vijay Rupani) यांचा कोविड 19 टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं आज (15 फेब्रुवारी) सांगण्यात आलं आहे. दरम्यान विजय रूपाणी काल वडोदरा मध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना चक्कर आली होती. आता विजय रूपाणीना कोरोनाची लागण झाली असून त्यांना सौम्य लक्षणं असल्याची माहिती अधिकृत हेल्थ बुलेटीन द्वारा सांगण्यात आलं आहे.

विजय रूपाणी हे 64 वर्षीय आहेत. काल ते गुजरातच्या वडोदरा मध्ये निझामपुरा भागात दाखल झाले होते. ते एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना मायक्रो फोन नीट करता करता त्यांना चक्कर आली. त्यावेळेस त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकाला त्यांना चक्कर आल्याचं समजलं. त्याने मुख्यमंत्र्यांना सावरलं आणि कोसळण्यापासून वाचवलं. त्यानंतर विजय रूपाणी यांना तात्काळ सरकारी UN Mehta Institute of Cardiology and Research Centre मध्ये दाखल करण्यात आलं. (नक्की वाचा: कुख्यात गुंड अरुण गवळी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रकृती उत्तम, जावई अक्षय वाघमारे याने दिली माहिती).

ANI Tweet

विजय रूपाणींच्या हेल्थ बुलेटीन मध्ये डॉ. आर के पटेल यांनी मुख्यमंत्र्यांच्या काल रात्री ECG, 2D echo आणि रक्ताचा रिपोर्ट नॉर्मल असल्याचं म्हटलं आहे. पण आज सकाळी आलेला त्यांचा RT-PCR test रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान हेल्थ बुलेटीन मध्ये त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत पण प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं आहे. सोबतच oxygen saturation, HRCT Thorax, IL-6 आणि D-Dimer देखील योग्य असल्याचं म्हटलं आहे.

भारतात आज  11,649 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 कोटी 9 लाख 16 हजार 589 वर पोहोचली आहे. तर मागील 24 तासांत 9,489 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.