गुजरातमध्ये (Gujarat) प्रवाशांनी खचाखच भरलेली सुसाट बस समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात (Bus Accident) तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त लक्झरी बस गुजरातमधील राजकोट येथून सुमारे 60 प्रवाशांना घेऊन बलरामपूरच्या दिशेने निघाली होती. सोमवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास कोतवाली देहाट परिसरात आली असता, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले अन् क्षणार्धात बस समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. (हेही वाचा - Massive Accident In Bengaluru: बेंगळुरूमध्ये महामार्गावर धुक्यांमुळे अपघात, अनेक कार एकमेकांवर आदळल्या; (Watch Video))
हा अपघात इतका भीषण होता, की बस आणि ट्रकचा अक्षरश: चक्काचूर झाला या अपघातात ट्रकचालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी बचावकार्य करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पर्यटन परवान्यांच्या नावाखाली जिल्ह्यातील विविध मार्गांवर अनेक राज्यांमध्ये बसेस चालवल्या जातात आणि त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले जातात.