Massive Accident In Bengaluru: देशात वाढत्या धुक्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये धुक्यामुळे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बेंगळुरू विमानतळ रोडवरील दोड्डाजालाजवळ सोमवारी कार अपघात झाला. या घटनेत अनेक कार एकमेकांना आदळल्या आहे. अपघातानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर जखमी झाल्याचे वृत्त नाही. रस्त्यावर अपघातानंतर बराच वेळ वाहतुक कोंडी झाली होती. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली, पोलिस अधिकारी घटना स्थळी दाखल झाल्यानंतर वाहतुक सेवा सुरळीत केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)