गुजरात विधानसभा निवडणूक 2022 (Gujarat Assembly Election Result 2022) मध्ये सत्ताधारी भाजप पुन्हा एकदा आपली सत्ता कायम राखणार असे दिसते आहे. एखाद् दुसरा अपवाद वगळता अद्याप कोणत्याही उमेदवाराच्या विजयाची घोषणा झाली नसली तरी, गुजरातमध्ये भाजप मोठी आघाडी घेताना दिसत आहे. एकूण 182 पैकी 152 जागांवर भाजप आघाडीवर आहे. भाजपचा पारंपरीक प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस (Congress) मात्र या निवडणुकीत भलताच गळपाटल्याचे पाहायला मिळत आहे. सद्यास्थितीत काँग्रेस केवळ 18 जागांवर आघाडी वर आहे. विशी पार करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. दुसऱ्या बाजूला गुजरातमध्ये अगदीच नवख्या असलेला अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष (AAP) चंचूप्रवेश करेल असे दिसते. आम आदमी पक्षा गुजरातमध्ये सध्या 07 जागांवर आघाडीवर आहे. अपक्ष पाच ठिकाणी आघाडीवर आहेत.
गुजरातमध्ये भाजप पाठिमागील 27 वर्षांपासून सत्तेत आहे. आताही भाजप पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर बहुमताने सत्तेत येण्याची चिन्हे आहेत. महत्त्वाचे म्हणजे गुजरातचे मतदार आपलाही काही प्रमाणात स्वीकारताना दिसते आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसची मात्र पिछेहाट होताना दिसत आहे. हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार, भगवाधारी पार्टी भाजप 150 जागा जिंकत ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा वापरून भाजप पाठिमागील अनेक वर्षांपासून गुजरातमध्ये निवडणुकीत उतरत आहे. ज्याचा पुरेपूर फायदा भाजपला होताना दिसतो आहे. भाजप या निवडणुकीत जिंकतो तर भाजपचा हा सातवा विजय ठरतो. भाजप हा भक्तम निवडणूक व्यवस्तापण आणि नरेंद्र मोदी यांची लाट यांच्या जीवावर सत्ता मिळवताना दिसतो आहे. (हेही वाचा, Gujarat, HP Election Results 2022 Live News Update: Himachal Pradesh)
गुजरातमध्ये भाजप दणदणीत विजयाकडे वाटचाल करतानान आम आदमी पक्षही तुलनेत भक्कम जनाधार मिळवतो आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेला हा पक्ष दहा राज्यांमध्ये निवडणूक लढला आहे. गुजरातमध्येही आपने उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. इशुदान गढवी हे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते.
काँग्रेसने गुजरातमध्ये मात्र या वेळी खूपच अदखलपात्र कामगिरी केली. काँग्रेसला किमान तीस जागांवरही आघाडी घेताल आली नाही. काँग्रेस केवळ 20 जागांवरच गळपाटला आहे. अद्याप अंतिम निकाल जाहीर झाले नसले तरी, संभाव्य चित्रात फार बदल होण्याची शक्यात फारच कठिण दिसते.