Gujarat, HP Election Results 2022 Live News Update: हिमाचल प्रदेशमध्ये सत्तापरिवर्तन; काँग्रेसने 40 तर, भाजपने 25 जागा जिंकल्या
Election Result PTI

हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि गुजरात विधानसभा निवडणूक (Gujarat Vidhan Sabha Election) मतदानामध्ये जनतेने दिलेला कौल आज जाहीर केला जाणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून या निवडणूक निकालाचे कौल हाती येण्यास सुरूवात होणार आहे. गुजरात मध्ये 182 आणि हिमाचल प्रदेशात 68 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडले आहे. दरम्यान आतापर्यंत हिमाचल प्रदेशात सत्तांतराची रीत आहे तीच कायम राहणार की बदलणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले. गुजरात हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. मागील 25 वर्ष सत्ता कायम राखणार्‍या गुजरात मध्ये भाजपा यंदा रेकॉर्डब्रेक कामगिरी करणार का? हे देखील पहावं लागणार आहे.

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, गुजरात मध्ये भाजपा आतापर्यंत 127 पेक्षा अधिक जागा जिंकू शकतील असा अंदाज आहे. तर हिमाचल प्रदेश मध्ये कॉंग्रेस आणि भाजपा मध्ये कांटे की टक्कर होऊ शकते असा अंदाज आहे. हिमाचल प्रदेश मध्ये 1985 पासून सलग दुसर्‍यांदा कोणताही पक्ष आपली सत्ता कायम ठेवू शकलेला नाही. त्यामुळे आता भाजपा खरंच 'रीत नही रिवाज बदलेंगे' आपली घोषणा खरी करणार का? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. ABP Majha Live Streaming For Gujarat and HP Assembly Results: गुजरात-हिमाचल प्रदेशात कोणाचे सरकार स्थापन होणार? भाजप सत्तेत राहणार की काँग्रेस-आपला संधी मिळणार? येथे पहा लाईव्ह अपडेट्स .

हिमाचल प्रदेशात 2017 च्या निवडणूकीनंतर संख्याबळ पाहता 44 जागांवर विजयी होत भाजप सत्तेवर आला होता. तर, काँग्रेसला 21जागांवर विजय मिळाला होता.