GST: जीएसटी परिषदेची 49 वी बैठक आज; पहा कोणत्या गोष्टी होऊ शकतात स्वस्त
GST PTI

जीएसटी (GST) परिषदेची 49 वी बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक (GST Council) होणार आहे. या बैठकीत अपीलीय न्यायाधिकरणाची स्थापना आणि पान मसाला आणि गुटखा व्यवसायातील करचोरी (Tax Evasion) रोखण्यासाठीच्या व्यवस्थेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच ऑनलाइन गेमिंग (Online Gaming) आणि कॅसिनोवरील मंत्र्यांच्या गटाचा अहवाल विचारात घेतला जाण्याची शक्यता नाही.

पान मसाला आणि गुटखा उद्योगातील कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी ओडिशाचे अर्थमंत्री निरंजन पुजारी यांच्या नेतृत्वाखालील मंत्री समुहाच्या अहवालावर बैठकीत विचार केला जाऊ शकतो. हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने गेल्या वर्षी जुलैमध्ये वस्तू आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरणाच्या अहवालावरही विचार केला जाण्याची शक्यता आहे. न्यायाधिकरणात दोन न्यायिक सदस्य असावेत, असे मंत्री समुहाने सुचवले आहे. त्यात केंद्र आणि राज्यांमधून प्रत्येकी एक तांत्रिक सदस्य असावा. शिवाय, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्याचे अध्यक्ष असावेत अशी देखील सुचना आहे.

जीएसटीच्या या परिषदेत सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो धान्य आणि त्यासंबधीत उत्पादनावरील जीएसटी हा 18% टक्क्यांहून थेट 5% होण्याची शक्यता आहे. या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. खुल्या बाजारात विक्री होणाऱ्या धान्याच्या पदार्थांवरील जीएसटी रद्द देखील होऊ शकते.

या वस्तू होऊ शकतात स्वस्त

ऑर्थोपेडिक मशीन

संरक्षण उत्पादने

स्टेशनरी वस्तू

सिमेंट

सीलबंद अन्नपदार्थ

हॉटेलिंग, खाण्या-पिण्याच्या वस्तू

रोपवे राईड्स

या वस्तू होऊ शकतात महाग

रुग्णालयातील बेड

एलईडी लाईट्स, लँप्स

चाकू, ब्लेड, पेन्सिल, शार्पनर

बँकेचे चेक बूक

हॉटेल बुकिंग

किचनमधील स्टीलचे चमचे व साहित्य

पंप आणि मशीन