कोरोना संबंधित गोष्टीबद्दल मंत्र्यांच्या सामूहिक सिफारशीबद्दल GST काउंसिलकडून स्विकारण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी काउंसिल कडून ब्लॅक फंगस (Black Fungus) हे औषध टॅक्स फ्री करण्यास परवानगी दिली आहे. तसेच कोरोना संबंधित काही अन्य गोष्टींवरील कराचे दर ही कमी करण्यात आले आहेत.(आता वाहन परवानासाठी RTO मध्ये ड्रायव्हिंग टेस्टची गरज नाही; पहा काय आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा नवा नियम)
जीएसटी काउंसिल कडून कोरोनाच्या लसीवर 5 टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे. बैठकीनंतर प्रत्रकार परिषदेत निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकार 75 टक्के लस खरेदी करणार आहे. त्यावरील जीएसटी सुद्धा देत आहे. मात्र शासकीय रुग्णालयात ही लस सर्वसामान्यांना मोफत दिला जाणार असल्याने त्याच्या जनतेवर काहीच परिणाम होणार नाही. दरम्यान, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि ओडिशा सारख्या राज्यांकडून वारंवार कोरोना लसीवरील जीएसटी कर रद्द करण्याची मागणी करत आहेत.(ATM Transaction Fee Hike: RBI कडून एटीएम ट्रान्झॅक्शन वर आकारण्यात येणार्या चार्ज मध्ये केली वाढ; पहा 1 जानेवारी 2022 पासून किती असेल शुल्क)
Tweet:
GST rates have been decided for 4 categories of products- medicines, oxygen, oxygen-generation equipment, testing kits and other machines and other COVID19 related relief material. Rates to be announced soon: Finance Minister Nirmala Sitharaman
— ANI (@ANI) June 12, 2021
जीएसटी काउंसिलने कोरोना वरील महत्वपूर्ण औषध रेमिडेसिव्हर याच्यावरील जीएसटी दर 12 टक्के कमी करुन 5 टक्के केला आहे. या व्यतिरिक्त ऑक्सीमीटर, मेडिकल ग्रेडच्या ऑक्सिजन आणि वेंलिटेलरवरील ही दर 12 टक्के कमी करुन 5 टक्के करण्यात आला आहे. तर देशात अद्याप कोरोनाची परिस्थिती पाहता जीएसटी काउंसिलची ही 44वी बैठक व्हिडिओ कॉन्फ्रेंन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकुर आणि अर्थमंत्रालयाचे काही अधिकारी उपस्थितीत होते.