ग्रेटर नोएडा येथे राहुल- प्रियंका गांधी यांच्यासह जवळजवळ 200 जणांच्या विरोधात FIR दाखल
Priyanka Gandhi & Rahul Gandhi | (Photo Credit: PTI)

काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि महासचिव प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांच्या विरोधात ग्रेटर नोएडा येथील पोलिस स्थानकात FIR दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह 200 जणांच्या विरोधात ही एफआयआर दाखल केल्याचे स्पष्ट केले आहे. एफआयआर मध्ये या लोकांच्या विरोधात काही कायदेशीर कलमाअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. गौतमबुद्ध नगर पोलिसांकडून हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी असे म्हटले आहे की, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी जवळजवळ 200 कार्यकर्त्यांसह हाथरस येथे जाण्यासाठी डीएनडीच्या रस्तांनी नोएडात प्रवेश केला. त्यामध्ये जवळजवळ 50 गाड्यांचा ताफा होता. पण गाड्यांचा ताफ्यातील सर्वांना कलम 144 आणि कोविड19 च्या स्थितीमुळे पुढे जाऊ दिले नाही. पण ताफ्यातील लोकांनी खाली उतरण्यासह नियमांचे उल्लंघन करत वेगाने यमुना एक्सप्रेस वे च्या दिशेने जाऊ लागले.(Hathras Case: केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले करणार हाथरस चा दौरा; आरोपींना फाशी देण्याची मागणी)

पुढे असे ही पोलिसांनी सांगितले की, एक्सप्रेस वे येथे ताफ्यातील दोन गाड्यांची टक्कर सुद्धा झाली. त्यानंतर यमुना एक्सप्रेस वे च्या येथे त्यांना अवडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेथेच काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी पोलिसांसोबत वाद आणि धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी एमुना एक्सप्रेस वे वर आपल्या कार्यकर्त्यांसह पायी चालू लागले. त्यामुळे दोन्ही बाजूंनी कोंडी झाल्याचे दिसून आले. या कोंडीत रुग्णवाहिका सुद्धा अडकून पडल्या होत्या.

जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आला आहे. त्यामुळे परवानगीशिवाय एक्सप्रेस वे येथे एवढ्या बहुसंख्येने लोकांनी जबरदस्तीने जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जमावबंदीच्या नियमांचे उल्लंघन केले. पोलिसांनी लॉ अॅन्ड ऑर्डरची स्थिती बिघडल्याचे ही सांगितले. मात्र या लोकांवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह 203 जणांच्या विरोधात FIR दाखल केला आहे.(काँग्रेस खासदार राहुल गांधी Hathras येथे पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी निघाल्यानंतर झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकारामुळे राज्यातील नेते मंडळींकडून निषेध व्यक्त; पहा ट्विट्स)

 दरम्यान, राहुल आणि प्रियंका गांधी हाथरस मधील सामूहित बलात्कार प्रकरणारातील पीडितेच्या परिवाराला भेटण्यासाठी गेले होते. परंतु या दोघांना ग्रेटर नोएडाच्या एक्सप्रेस वे येथे अडवण्यात आले. तसेच पोलिसांनी त्यांना ताब्यात ही घेतले. पण नंतर या दोघांना सोडण्यात आले. पोलिसांनी सोडल्यानंतर हे दोघे दिल्लीत परतले.