ग्रेटर नोएडा: व्हेज बिर्याणी विकणे तरुणाला पडले भारी; जातीवरून अपशब्द वापरत जमावाने केली मारहाण (Video)
Dalit youth assaulted in Noida | (Photo Credits: Screengrab/Twitter/@wajihulla)

राजधानी दिल्ली येथून ग्रेटर नोएडा येथे बिर्याणी विक्री करण्यासाठी आलेल्या एका 43 वर्षीय व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. तर व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पीडित विक्रेत्याला मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. त्याचसोबत व्यक्ती विक्रेत्याला जातीवरुन सुद्धा अपशब्द आणि शिवीगाळ करत आहे. ही घटना व्हिडिओच्या माध्यमातून समोर आल्यानंतर तातडीने पोलिसात याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांच्या मते पीडित व्यक्तीला बेदम मारहाण करणाऱ्या चार आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. तसेच यामधील चारपैकी तीन आरोपींची ओळख पटली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.(बलात्कार आणि खून प्रकरणी तब्बल 12 वर्षानंतर होणार पीडितेच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम; 8 वर्ष तुरुंगवासानंतर निर्दोष सुटला होता आरोपी)

ANI Tweet: 

आरोपी हे पीडित व्यक्तीच्या गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे व्हिडिओच्या आधारे जे काही सत्य समोर येईल त्यानुसार पोलीस कारवाई करणार आहेत. याबाबत पीडित व्यक्तीने पोलिसांना असे म्हटले आहे की, चार व्यक्ती एका गाडीमधून आले. त्यांनी मी जिथे बिर्याणी ठेवली होती त्याची नासधूस करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या प्रकाराचा विरोध केला असता त्यांनी जातीवरुन मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच आरोपींनी मला मारहाण करत यापुढे बिर्याणी विकणे बंद कर अशी धमकी देत निघून गेल्याचे म्हटले आहे.