प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Wikimedia Commons)

राज्यसभेत गुरुवारी (4 जुलै) सर्व विभागाच्या सदस्यांची एक बैठक पार पडलीय या बैठकीदरम्यान सध्या देशात विविध नशा करण्याचे प्रमाण अधिकाधिक वाढत चालले आहे या विषयावर चर्चा झाली. तर एका सर्वेक्षणाच्या अहवालानुसार भारतात 16 करोड लोक दारुच्या आहारी गेले आहेत. तर 3.1 करोड लोक भांग उत्पादनांचे सेवन करतात असे उघड झाले आहे. सरकार देशातील प्रमुख 10 शहरांमधील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून वाढत्या नशेच्या सवयीच्या सर्वेक्षणातून माहिती जमा करत आहे.

सामाजिक न्याय आणि मंत्री थावरचंद गहलोत (Thawar Chand Gehlot) यांनी असे म्हटले आहे की, 2018 मध्ये प्रथम अशा पद्धतीचे सर्वेक्षण केले आहे. त्याची जबाबदारी नॅशनल ड्रग्ज डिपेंडेंस सेंटर,अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान यांना देण्यात आली होती. तर 10 ते 75 वयोगटातील व्यक्ती जवळजवळ 1.18 करोड लोक सीडेटिव्स पद्धतीचा उपयोग करतात. तर अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या गटात जवजवळ अल्पवयीन मुलांचा समावेश सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.

(गोरखपूर: TikTok व्हिडिओ बनवण्यासाठी दोन तरुणांची पूलावरुन उडी, एकजण बेपत्ता)

तर यंदाच्या वर्षात नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तींचा आकडा किती आहे ते नोव्हेंबर 2019 पर्यंत स्पष्ट होणार आहे. त्याचसोबत श्रीनगर, चंदीगड, लखनौ, रांची, मुंबई, बंगळूरु, हैदराबाद, इंफाल, डिब्रुगड आणि दिल्ली येथे हे सर्वेक्षण केले जाणर आहे.