Government Formation in Maharashtra: शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस (Shiv Sena-NCP-INC) अशी नवी आघाडी राज्यात उदयास येत असताना आणि ही आघाडी सत्तास्थापनेच्या जवळ पोहोचली असतानाच राज्याच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे विधीमंडळ गटनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी रातोरात भाजपसोबत हातमिळवणी केली. इतकेच नव्हे तर, त्यांनी राजभवन येथे थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. अजित पवार यांच्या या कार्यकर्तृत्वामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. इतके सगळे रामायण घडल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार हे वेगवेगळ्या भूमिका व्यक्त करताना दिसत आहेत. ट्विटरवर तर दोघांमध्ये ट्विटयुद्ध चालले आहे की काय वाटावे असे चित्र दिसते आहे. या सर्व गदारोळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मतदार जनता कोणासोबत? हे कळायला सध्या तरी मार्ग नाही.
शिवसेना, भाजप हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणूक 2019 युती करुन लढले. या निवडणुकीवर लोकसभा निडवणूक 2019 ची छाया होती. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि संयुक्त पुरोगामी आघाडीचे घटक पक्ष निकराने लढले. तरीही जनमाने आपला कौल भाजप नेतृत्वाखाली असलेला राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पदरा टाकला. यात शिवसेना पक्षालाही चांगले यश मिळाले. या पार्श्वभूमिवर विधानसभा निडवणूक 2019 मध्ये जनमत हे भाजप-शिवसेना महायुतीच्या बाजूने असल्याचे चित्र होते. त्यातही हे जनमत भाजपच्या अधिक बाजूने असल्याचे चित्र होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत हे चित्र भलतेच दिसले. जनतेने स्पष्ट बहुमत कोणत्याच पक्षाला दिले नाही. त्यामुळे दोन किंवा तीन पक्षांनी एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होणे अशक्य होते. (हेही वाचा, मी राष्ट्रवादी पक्षातच, शरद पवार हेच आपले नेते; अजित पवार यांच्या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात तर्कवितर्क)
विधानसभा निवडणूक निकालात चित्र वेगळे दिलले कारण?
विधानसभा निवडणूक 2019 मध्ये महायुतीचा आक्रमक प्रचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी एकहाती रोखून धरला. शरद पवार यांनी निवडणूक प्रचारात दिलेली निकराची झूंज ही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. शरद पवार आणि त्यांच्यासोबत अजित पवार, जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे यांच्याह अनेक नेत्यांनी दिलेली साथही या वेळी महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे एकहाती सामना जिंकू असा विश्वास असलेल्या महायुतीच्या स्वप्नांना सुरुंग लागला. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने आपली मूळं कायम ठेवत उभारी घेतली. (हेही वाचा, अजित पवार यांच्या भूमिकेवर शरद पवार यांचे महत्त्वपूर्ण ट्विट, 'अजित पवार दिशाभूल करत आहेत')
शरद पवार ट्विट
भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. @NCPspeaks ने @ShivSena व @INCMaharashtra यांच्यासोबत हातमिळवणी करत महाराष्ट्र सरकार स्थापन करण्याचे एकमताने ठरविले आहे. @AjitPawarSpeaks यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरविणारे आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 24, 2019
मतदार, जनता संभ्रमात
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झाली असताना आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आदी पक्षांचे सरकार आघाडी सरकार सत्तेत येण्याचा क्षण जवळ आला असतानाच अजित पवार यांनी मोठा धक्का दिला. अजित पवार हे आपला गट घेऊन भाजपसोब गेल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांचे बंड मोडून काढण्याले चित्र आज घडीला तरी दिसत असले तरी, शरद पवार आणि अजित पवार यांच्यात कुठेतरी संघर्ष पाहालया मिळत आहे. त्यामुळे ट्विटरवरही दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमिवर रष्ट्रवादीच्या मतदार आणि जनतेमध्ये मात्र आता कोणती राष्ट्रवादी खरी आणि आपण कोणाऱ्या पाठिमागे जायचं? असा प्रश्न विचारला जात आहे.
अजित पवार ट्विट
I am in the NCP and shall always be in the NCP and @PawarSpeaks Saheb is our leader.
Our BJP-NCP alliance shall provide a stable Government in Maharashtra for the next five years which will work sincerely for the welfare of the State and its people.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
दरम्यान, राज्यातील आमदार संख्येची पक्षीय बलाबल पाहता भाजप (BJP) – 105, शिवसेना (Shiv Sena) – 56, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) – 54, काँग्रेस(Congress) – 44, बहुजन विकास आघाडी – 03, प्रहार जनशक्ती – 02, एमआयएम – 02, समाजवादी पक्ष – 02, मनसे – 01, माकप – 01, जनसुराज्य शक्ती – 01, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01, शेकाप – 01, रासप – 01, स्वाभिमानी – 01, अपक्ष – 13 अशी आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाला एकट्याला सत्तास्थापन करात येणे अशक्य आहे. त्यामुळे जर सत्तास्थापन करायची तर दोन किंवा तीन पक्षांना एकत्र येऊनच सत्ता स्थापन करावी लागणार आहे.