केंद्र सरकारने सुरु केलेल्या किसान सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाले आहेत. रविवारी (24 फेब्रुवारी) गोरखपुर (Gorakhpur) येथे या योजनेच्या शुभारंभाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली आहे. तसेच एकूण दोन हजार 21 कोटी रुपये आतापर्यंत जमा केल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.
या योजनेचा लाभ 21 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर विरोधकांकडून विविध अफवा पसरवल्या जात असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. आता सध्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात दोन हजार रुपये देण्यात आले आहेत. परंतु लवकरच पुढील हप्ताही देण्यात येणार आहे.(हेही वाचा-मोदी सरकारचं नवं गिफ्ट! GST मध्ये मोठ्या बदलांमुळे मेट्रो सिटीतली घरं सर्वसामान्यांच्या आवाक्यात)
तर विरोधकांच्या सरकारने शेतकऱ्यांची यादी अद्याप पाठवली नाही. त्याचसोबत उत्तर प्रदेश,उत्तराखंड, गुजरात, बिहार आणि महाराष्ट्रातील राज्यांनी शेतकऱ्यांची यादी केंद्राकडे सुपुर्द करण्यात आली आहे. मात्र ज्या विरोधकांच्या सरकारने यादी पाठवली नाही त्यांच्यावर मोदी यांनी टीका करत शेकऱ्यांसोबत असे वागणार असाल तर त्यांचे शाप तुम्हाला लागून उध्वस्त व्हाल असा इशारा विरोधी पक्षांच्या सरकारला दिला आहे.