Gold-Silver Price | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

एकीकडे शेअर बाजार 60 हजारा पार जाण्याच्या उंबरठयावर असताना दुसरीकडे सोनं चांदी यांचे दर (Gold-Silver Rates) घसरले आहेत. आज शुक्रवार (17 सप्टेंबर) दिवशी सोनं 30 रूपयांनी घसरून 46,090 वर आज उघडलं होतं. गुरूवारी सोनं 46,129 रूपयांवर बंद झालं होतं. चांदीमध्ये दरवाढ बघायला मिळाली आहे. प्रतिकिलो काल 61,077 रूपये प्रतिकिलो चांदी आज 91 रूपयांनी वाढून 61,168 रूपयांवर उघडली आहे.

सोन्याच्या किंमती मध्ये आज मोठी घसरण झालेली नाही पण सोनं आता खूप दिवसांनी 10 हजारांपेक्षा अधिक स्वस्त झालं आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सोनं 56,200 रूपये या उच्चांकी स्तरावर होते. आता 10 ग्राम साठी सोनं 46,090 वर आहे. या हिशोबाने सोनं 10 हजारांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे खरेदीसाठी चांगली संधी आहे. हेदेखील वाचा- Gold Shopping: सोने खरेदी करत असाल तर हा नवा नियम नक्की वाचा; बनावट सोने ओळखणे आता होणार सोपे.

IBJA Tweet 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण झाली आणि रूपया सुधारला आहे. मागील वर्षी सोनं 28% रिटर्न देत होते. त्यापूर्वीच्या वर्षी 25% रिटर्न मिळाले होते. तुम्ही लॉंग टर्म साठी सोन्यामध्ये गुंतवणूक करणार असाल तर हा एक चांगला पर्याय आहे.