Gold, Silver Price Today: दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या प्रमख शहरातील 14 सप्टेंबरचे सोने, चांदी दर घ्या जाणून
Jewellery (Photo Credits: Pixabay)

सोने चांदी दर (Gold, Silver Price Today) म्हटले की चढ उतार आले. आज दिल्ली सराफा बाजारात सोने ( Gold Price) 46,000 रुपये प्रति 10 ग्रॅम म्हणजेच प्रति तोळा दराने विकले जात आहे. हेच सोने मुंबई सराफा बाजारात 47,010 रुपये प्रति 10 ग्रॅम (24 कॅरेट) दराने विकले जात आहे. पाठिमागील काही महिन्यांमध्ये सोने दरात प्रचंड चढउतार पाहायला मिळत आहे. अर्थात अलिकडील काही आठवड्यात थोड्याफार किंमतींचा फरस वगळता दर स्थिर राहिले आहेत. चांदी (Silver Price दरातही असाच काहीसा बदल पाहायला मिळतो आहे. आंतरराष्ट्रीय सोने बाजारात सोने दरात घट झाल्याने देशांतर्गत सराफा बाजारातही मोठ्या प्रमाणावर सोने-चांदी दरात घट पाहायला मिळते आहे.

भारतात सोने 55,000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतक्या उच्चांकी दराने विकले गेले आहे. त्यानंतर सोन्याचे भाव कमी होत होत आता ते सरासरी 46,000 रुपयांवर आले आहेत. सणांच्या काळात सोने दर वाढत जातील अशी आपेक्षा व्यक्त केली जात आहे. GoldPrice.org या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय वेळेनुसार सकाळी 11.2 वाजता MCX वर सोने दरात 0.20% इतकी वाढ दिसली. ही वाढ 1790.68 डॉलर प्रति औंस इतकी होती. (हेही वाचा, Karnataka: काय सांगता? फळ विक्रेत्याने खरेदी केला तब्बल 6.5 लाखाचा नारळ; जाणून घ्या काय आहे खास)

चांदी दराबाबत बोलायचे तर चांदी दरात 0.47% घसरण पाहायला मिळाली. ही घसरण 23.67 डॉलर प्रति औंस इतकी होती. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन (IBJA) ची किंमत पाहिली तर शेवटची माहिती हाती आली तेव्हा किमती (बिना GST खाली प्रमाणे होत्या.

भारतातील प्रमुख शहरांतील सोने दर (22 आणि 24 कॅरेट)

दिल्ली-

22 कॅरेट: 46,140

24 कॅरेट: 48,390

चांदी- 63,400 रुपए प्रति किलो

मुंबई-

22 कॅरेट: 46,010

24 कॅरेट: 47,010

चांदी- 63,400 रुपए प्रति किलो

कोलकाता-

22 कॅरेट: 46,550

24 कॅरेट: 49,250

चांदी- 63,400 रुपए प्रति किलो

चेन्नई-

22 कॅरेट: 44,390

24 कॅरेट: 48,390

चांदी- 63,500 रुपए प्रति किलो

दरम्यान, Good Returns संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार मंळवारी 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 1 ग्रॅम- 5034, 8 ग्रॅम- 40,272, 10 ग्रॅम- 50,340,100 ग्राम -503400 रुपये इतका आहे.