गेले काही दिवस सोने चांदीचे (Gold Silver Rate) भाव अगदी गगनाला भिडले होते. तरी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे भाव चकाकल्याचं चित्र आहे. तरी तुम्ही सोन्या चांदीची खरेदी करण्याच्या विचारात असाल तर हो ही बातमी तुमच्यासाठी आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सोने चांदिच्या दरात मोठी वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे. नवीन वर्षात म्हणजेचं २०२३ मध्ये सोने चांदीच्या किंमतींच्या मोठे बदल बघायला मिळत आहेत. तरी नव्या वर्षात सोने, चांदीच्या दरात कमालीची वाढ झाली असुन तुम्ही ज्वेलरी शॉपमध्ये जावून दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी सोने चांदीचे नवे दर जाणून घ्या आणि त्याप्रमाणे तुमचा निर्णय घ्या. जेणेकरुन आपल्याला सोने, चांदी खरेदी करणे सोपे जाऊ शकते. सोन्या-चांदीचे भावात (Gold Silver Price) आज लक्षणीय वाढ बघायला मिळत आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 56,470 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 69,420 रुपये आहे.
गेले काही दिवस सोने चांदीचे (Gold Silver Rate) भाव अगदी गगनाला भिडले आहे. तरी तुम्ही सोन्या चांदीची खरेदी करण्याच्या विचारात असाल तर हो आता सोन खरेदी करण्यासाठी काही दिवस थांबावं हाचं मोलाचा सल्ला असेल. पण आता मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सराफा बाजारात (Sarafa Market) मोठी गर्दी बघायला मिळत आहे. नवविवाहीत वधु-वरांची मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सोने-चांदी खरेदीकडे मोठा कल दिसत आहे. (हे ही वाचा:- LPG cylinder Price Hike Today on January 1, 2023: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दणका, एलपीजी दरात वाढ)
राज्यात आजचा 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम तर 56,470 तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,764 आहे. 1 किलो चांदीचा दर 69,420 रुपये आहे. तरी आज देशभरात सोन्याचे भाव कमालीचे वाढल्याचे चित्र आहे. पुढील कालावधीत सोने चांदिचे भाव आणखी वाढणार असण्याची शक्यता आहे. तरी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे भाव चकाकल्याचं चित्र आहे.