ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) नवीन वर्ष 2023 च्या पहिल्या दिवशी LPG सिलिंडरच्या किमतीत वाढ करून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र, घरगुती वापरासाठीच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नसून तीच किंमत कायम आहे, ही दिलासादायक बाब आहे. नव्या वर्षातील पहिल्याच दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारी 2023 पासून सरकारने काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. प्रामुख्याने याचा भार तुमच्या खिशावर पडणार आहे.यात प्रामुख्याने यामध्ये क्रेडिट कार्ड (Credit Cards), बँक लॉकर्स (Bank Lockers), GST ई-इनव्हॉइसिंग (GST e-Invoicing), CNG-PNG किमती (CNG-PNG Prices) आणि वाहनांच्या किमतींशी (Vehicle prices) संबंधित बदलांचा समावेश आहे. त्यामुळे हे बदल येणाऱ्या वर्षात सर्वसामान्यांना संमिश्र परिणाम दाखवताना दिसतील.
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती
OMC ने 1 जानेवारी 2023 पासून व्यावसायिक सिलिंडरचे दर 25 रुपयांनी वाढवून दर बदलले आहेत. हा निर्णय रेस्टॉरंट्स, हॉटेल्स इत्यादींना मोठा धक्का मानला जात आहे. तथापि, याचा सामान्य लोकांच्या बजेटवर थेट परिणाम होत नाही. परंतू, तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यास दरपत्रकात बदल झाल्याचे मात्र तुम्हाला निश्चित दिसू शकेल. अर्थात, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती कायम राहणार आहेत. (हेही वाचा, New Rules in 2023: क्रेडीट कार्ड, बँक लॉकर, आधार-पॅन लिंक यांसह अनेक नियमांमध्ये 1 जानेवारी 2023 पासून महत्त्वाचे बदल, घ्या जाणून)
देशातील प्रमुख शहरांतील गॅस सिलिंडर दर
- दिल्ली-1769 रुपये प्रति सिलिंडर
- मुंबई- 1721 रुपये प्रति सिलिंडर
- कोलकाता- 1870 रुपये प्रति सिलिंडर
- चेन्नई- 1917 रुपये प्रति सिलेंडर
ओएमसीने 6 जुलै 2022 रोजी देशांतर्गत सिलिंडरच्या किमतीत अखेरची वाढ केली होती. तत्पूर्वी वर्षभरात ही किंमत चार वेळा वाढली आहे. मार्च 2022 मध्ये प्रथम OMC साठी पहिल्यादा 50 रुपयांची वाढ करण्यात आली, त्यानंतर पुन्हा 50 रुपये आणि 3.50 रुपये करण्यात आली. मे मध्येही वाढ करण्यात आली होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये घरगुती सिलिंडरची किंमत 50 रुपये करण्यात आली होती. तेव्हापासून किमती स्थिर होत्या.