Gold Rate Today: सोन्याचे दरात जबरदस्त वाढ, दर पोहचले 41 हजारांच्या पार
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

देशात सध्या सोन्याच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. तर आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सोन्यात जबरदस्त वाढ झाल्याचे दिसून आले. रुपयात घसरण आणि जागतिक संकेतांमुळे सराफा बाजारातील 10 ग्रॅम सोन्याचे दर 54 रुपयांनी वाढल्याने 40,807 रुपये झाले होते. तर आज ही सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने सोन्याचा भाव 41,150 रुपयांवर पोहचला आहे. तर चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. एक किलोग्रॅम चांदीचे दर 56 रुपयांनी खाली उतरले आहेत. HDFC सिक्युरिटीचे सिनियर अॅनालिस्ट तपन पटेल यांनी असे म्हटले आहे की, डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाली आहे. रुपयात 11 पैशांनी खाली आला.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सोन्याचे दर 1,566.51 डॉलर प्रति औंसवर पोहचला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यामधील युद्ध पाहता सोन्याचे दर 42 हजारांवर पोहचले होते. याच कारणामुळे गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणूकीबाबत अनिश्चितता दिसून येत आहे. मात्र अधिक नफा मिळवण्यासाठी गुंतवणूकादार सोन्यात गुंतवणूक करण्याकडे वळत आहेत.(सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्क बंधनकारक करण्याच्या निर्णयाला वर्षभराची मुदतवाढ)

सर्वसाधारणपणे पाहायचे तर कोणतीही वस्तू स्वस्तात उपलब्ध असते तेव्हा लोक ती मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. परंतू, सराफा बाजारात काहीसे या उलट पाहायला मिळते. सर्वसामान्य बाजारपेठेचा नियम इथे लागू पडत नाही. इथे सोनं महाग होणार अशी शक्यता दिसली की लोक खरेदीसाठी अधिक घाई करतात. मात्र, अतीमहागाईचा नाही म्हटले तरी सराफा बाजारातील व्यवहारावर परीणाम झालेला पाहायला मिळते. तर खरेदी केलेले सोने बनावट तर नाही ना हे तपासायचे कसे असा विचार जर तुम्ही करत असाल तर त्यावर सरकारने एक नवा नियम लागू करणार आहे. या नव्या नियमामुळे बनावट सोने विक्रीवर आळा घालून फक्त शुद्ध सोनेच बाजारात विक्रीस उपलब्ध होणार आहे.