सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्क बंधनकारक करण्याच्या निर्णयाला वर्षभराची मुदतवाढ
Gold | Representational Image | (Photo Credits: IANS)

सोन्याच्या बाबत फसवणूक करणाऱ्यांवर आता चाप बसणार असून पुढील वर्षात म्हणजेच 2021 मध्ये 15 जानेवारी पासून फक्त हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची विक्री केली जाणार आहे. त्यामुळे 18 कॅरेट असलेले सोने 22 कॅरेटचे असल्याचे भासवून विकणाऱ्यांना चांगलाच फटका बसणार आहे. तर दागिन्यांवर हॉलमार्क नसल्यास त्याची विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात जबरदस्त दंड भरावा किंवा तुरुंगाची शिक्षा भोगावी लागणार आहे. शुद्ध सोन्याबाबत बोलायचे झाल्यास 11 कॅरेटचे 91.6 टक्के शुद्ध सोने असते. मात्र काहीजण सोन्यातून नफा मिळवण्यासाठी 89 किंवा 90 टक्के शुद्ध सोन्यालाच 22 कॅरेट असल्याचे दाखवून ग्राहकाला विकले जाते. तर जाणून घ्या सोने खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करत असल्यास त्याचा प्रथम दर किती आहे जाणून घ्या. एखादा व्यक्ती IBJA यांच्या https://ibjarates.com/ संकेतस्थळावर जाऊन सोन्याचे दर तपासून पाहू शकता. आयबीजेए यांनी झळकवलेले दर देशभरात सर्वसामान्य असतात. मात्र या संकेतस्थळावरील देण्यात आलेल्या दरात 3 टक्के जीएसटी व्यतिरिक्त असतात. आजचा सराफा बाजारातील सोन्याचा दर 40,780 रुपये 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम आहे. (Fact Check: आरबीआय करतंय सोने विक्री? पहा व्हायरल रिपोर्ट्समागील सत्य)

खरे सोने हे 24 कॅरेटचे असते पण याचे दागिने बनवले जात नाहीत. कारण 24 कॅरेट सोने हे एकदम मऊ असते. त्यामुळे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेटच्या सोन्याचा वापर केला जात असून त्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. सोने खरेदी करताना नेहमीच हॉलमार्क आहे का हे पहावे. कारण एखाद्या वेळेस खरेदी केलेले सोने विकताना त्यावर हॉलमार्क नसेल तर मोठी समस्या उद्भवू शकते.