हिंदू संस्कृतीत साडे तीन मुहूर्तापैकी शुभ समजण्यात येणारा आजचाचं एक मुहूर्त म्हणजे दसरा (Dasara). आजच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणं, नव्या कामाची सुरुवात करणं या बाबींना विशेष महत्व आहे. तरी आजची सर्वोत्तम खरेदी म्हणजे सोन्याची खरेदी. आज सोने चांदी खरेदी (Gold Silver Purchase) करण्याचा नागरिकांचा अधिक कल असतो. तसेच आजच्या दिवशी सोने चांदीच्या खरेदीस शुभ समजल्या जातं. तरी तुम्ही सोने चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर आजचा मुहूर्त अगदी उत्तम. पण मुहूर्ताबरोबर किंमत (Gold Silver Price) जाणून घेणं ही तेवढचं महत्वाचं. आज दसऱ्या निमित्त सोन्याच्या बाजारात मोठी गर्दी बघायला मिळत आहे पण दुकानात खरेदीसाठी दाखल होण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव.
सोन्या-चांदीचे भावात (Gold Silver Price) आज दसऱ्याच्या मुहूर्तावर लक्षणीय वाढ बघायला मिळत आहे. कालच्या सरासरी सोन्याच्या भावाच्या तुलनेत आजचा सोन्याचा भाव तब्बल 550 रुपयांनी वाढला असुन आजचा सोन्याचा प्रति 10 ग्रामचा दर 51,660 रुपये आहे. तर कालच्या दराच्या एकूण तुलनेत चांदीत प्रती किलो मागे 4,400 रुपयांची वाढ झाली असुन 61,800 रुपये प्रति असा चांदीचा दर आहे. (हे ही वाचा:- Happy Dussehra Wishes: विजयादशमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह विविध नेते मंडळींकडून दसऱ्याच्या अनोख्या शुभेच्छा)
राज्याची राजधानी मुंबईत (Mumbai) आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 51,660 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 47,350 रुपये आहे. तसेच अमेरिकन डॉलरच्या (Dollar) तुलनेत जर रुपया आणकीच घसरला तर भारतात सोने महाग होण्याची मोठी शक्याता वर्तवण्यात येत आहे. तरी तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असल्यास आज शुभ मुहूर्तासह पुढील सोने किमतीचा वेध घेता आज सोने खरेदी करणं अधिक फायद्याचं ठरेल.