कोरोना (Corona) महामारीनंतर म्हणजेच तब्बल दोन वर्षांनंतर आपण यावर्षी सारे उत्सव सण समारंभ धुमधडाक्यात साजरे करत आहोत. गणेशोत्सव (Ganeshotsav), नवरात्री (Navratri) उत्सव अगदी दणक्यात पार पडले. आज दसरा (Dussehra), हिंदू (Hindu) संस्कृती प्रमाणे साडेतीन मुहूर्तापैकी एक. दसरा म्हणजेच विजयादशमी (Vijayadashmi). खोट्यावर खऱ्याचा विजय अशी दसरा या सणाची ओळख आहे. या दिवशी याचं दिवशी प्रभु श्रीरामाने (Lord Ram) सिमोल्लंघन केले होते म्हणून या दिवसाला हिंदू संस्कृतीत विशेष महत्व आहे.  नवरात्रीचा (Navratri) नऊ दिवसाचा उत्सव संपल्यानंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा करण्यात येतो. यादिवशी रावण दहन करण्यात येतं, शस्त्र पुजा (Ayudh Puja) केली जाते, नवीन कामाची सुरुवात केली जाते. अनेक उत्सह साजरा करणारा हा दिवस संपूर्ण भारत भऱ्यात धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. तरी पारंपारिक रीतीने तुम्ही तुमच्या मित्रपरीवात, नातेवाईकांत कुटुंबासह हा सण साजरा करण्याची, शुभेच्छा देण्याची परंपरा आहे. तरी देशातील विविध राजकीय मंडळींकडून दसऱ्याच्या अनोख्या शुभेच्छा देण्यात आहे.

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी स्वत:च्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवर (Twitter) ट्वीट करत म्हणाले, विजयाचे प्रतीक असलेल्या विजयादशमीच्या सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. यावर्षीचा दसरा प्रत्येकाच्या आयुष्यात धैर्य, संयम आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येवो.

 

तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भगवान श्रीरामाच्या फोटो पोस्टकरत राज्यातील जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयादशमीसह धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान देशातील जनतेला दसऱ्याच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

 

राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी समाजातील नकारात्मक प्रवृत्तीचे दहन करून सर्वत्र सकारात्मकतेचे चैतन्य निर्माण होऊ दे, असं सुचक ट्वीट करत विजयादशमीच्या विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.