Gold | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Gold Silver Rate: भारतीय सराफा बाजारात आज (6 मार्च 2023) मोठी घडामोड पाहायला मिळाली. पाठीमागील अनेक दिवसांपासून उच्चांकी पातळी गाठणारे सोने दर (Gold Rate) आज काहीसे उतरताना पाहायला मिळाले. सोन्याच्या दराने आपला 'ऑल टाईम हाय' सोडून प्रथमच उतार पाहिला. इंडियन बुलीयन ज्वेलर्स असोशिएशनचा हवाला देत गुडरिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज बाजार उघडला तेव्हा सोने दर 64,556 रुपये प्रति दहा ग्रँम (प्रति तोळा) इतक्या दरावर होता. या आधीच्या दिवशी सराफा बाजार बंद झाला तेव्हा सोने दर 64,598 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. आजचा बाजार पाहता सोने दर आपल्या विक्रमी पातळीवरुन प्रति तोळा 42 रुपयांनी घसरल्याचे पाहायला मिळते. 5 मार्च 2024 या दिवशी सोने दरात विक्रमी वाढ पाहायला मिळत होती. त्या दिवशी सोने प्रति तोळा 64,598 इतक्या दरावर सर्वोच्च विकले गेले.

चांदीही घसरली

दरम्यान, सोन्याच्या तुलनेत चांदीचा दर पाहता सराफा बाजार सुरु झाला तेव्हा चांदी प्रति किलो 71,713 रुपये इतक्या भावाने विकली जात होती. या आधीच्या दिवशी बाजार बंद झाला तेव्हा चांदी 72,224 रुपये किलो दराने विकली जात होती. त्यामुळे सोने दर प्रमाणेच चांदीतही जवळपास 531 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. आपल्या विक्रमी दरावरुन चांदी जवळपास 5221 रुपयांनी (प्रति किलो) उतरली आहे. (हेही वाचा, Gold Quality and Purity: 22 कॅरेट, 23 आणि 24 Carat सोने म्हणजे काय? तिन्हीमध्ये नेमका फरक काय?)

जाणून घ्या आजचा सोने दर

सोने खरे तर 10,14,18, 22 आणि 24 कॅरेटमध्ये खरेदी-विक्री केले जाते. भारतात मात्र, 22 आणि 24 कॅरेट सोन्याला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे इथेही केवळ 22, 24 कॅरेट सोन्याच्या दराबाबतच भाष्य करण्यात आले आहे. 22 कॅरेट म्हणजेच 91.7% प्रति तोळा म्हणजेच प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 64,298 रुपये इतका आहे. तर त्या तुलनेत 24 कॅरेट सोन्याचा म्हणजेच 99.09% सोन्याचा आजचा प्रति तोळा म्हणजेच प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 64, 556 रुपये इतका आहे. म्हणजेच अनुक्रमे 22 आणि 24 कॅरेट सोने 41 आणि 42 रुपयांनी उतरल्याचे पाहाला मिळते.

सांगितले जात आहे की, आंतरराष्ट्रीय सराफा बाजाराचा भारतीय सराफा बाजारावर मोठा परिणाम पाहायला मिळतो. त्यामुळे आर्थिक विश्वात घडणाऱ्या घडामोडी आणि त्याचे जागतिक सराभा बाजारात उमटणारे पडसाद पाहता सन 2024 मध्ये सोने दर प्रति तोळा म्हणजेच प्रति 10 ग्रॅम 70,000 इतक्या विक्रमी पातळीवर उसळी मारु शकते. दरम्यान, सोने दर काही काळा भारसा वधार किंवा घसरण न पाहता समपातळीत राहील. त्यानंतर भविष्यात सोने दरात मोठी उसळी पाहायला मिळेल. सोन्यातील घसरण अल्पकाळासाठी नुकसानकारक मात्र दीर्घकालीन विचार केल्यास ती फायदेशीर ठरु शकते, असे सराफा बाजारातील तज्ज्ञ सांगतात.