Gold-Silver Price Hike Today: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्यांने वाढ होताना दिसत आहे. तज्ञाच्या माहितीनुसार येत्या काही दिवसात सोन्या आणि चांदिच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज सोन्याच्या किंमत ही प्रती 10 ग्रॅमसाठी 60,450 रुपये इतकी आहे. कालच्या पेक्षा सोन्याच्या दरात जवळपास 100 हून अधिक रुपयांची वाढ झाली आहे. बुलियन मार्केट या वेबसाईटनूसार 75,460 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. चांदीच्या दरात देखील वाढ पहायला मिळाली आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्या चांदीचा दर बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 55,4113 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,450 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 55,413 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,450 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 55,422 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,460 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 55,422 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 60,460 रुपये आहे.