Imaged used for representational purpose only | (Photo Credits: Twitter/@goairlinesindia)

लो-कॉस्ट एअरलाइन्स गोएअरने (GoAir) देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी क्वारंटाईन पॅकेजेस (Quarantine Packages) सुरू केली आहेत. याअंतर्गत, क्वारंटाईन कालावधीमध्ये प्रवाशांना निवडक शहरांमध्ये स्वस्त ते महागड्या हॉटेल्समध्ये राहण्याची ऑफर दिली जात आहे. त्यासाठी खोलीचे भाडे 14,00 रुपयांपासून सुरू होईल. वाडिया समूह प्रमोटेड एअरलाइन्सने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीच्या दरम्यान एअरलाइन्स कंपनीने प्रथमच असे पॅकेज सादर केले. या पॅकेजचा लाभ घेण्यासाठी गो एअरच्या हॉलिडे पॅकेज वेबसाइटला भेट देऊन घेऊ शकाल.

हे पॅकेज देशातील किंवा परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. याद्वारे, निवडक हॉटेल्समध्ये प्रवासी स्वतःला वेगळे ठेऊ शकतील. निवेदनात म्हटले आहे की, या पॅकेजमध्ये कोची, कन्नूर, बेंगळुरू, दिल्ली आणि अहमदाबाद मधील बजेट आणि महागड्या हॉटेलांचा समावेश आहे. या पॅकेजअंतर्गत, एका व्यक्तीसाठी एका रात्री मुक्कामाची किंमत 1400 रुपये (19 डॉलर) पासून 5900 (79 डॉलर) असेल. बऱ्याचवेळी अनेक जणांना जागेच्या कमतरतेमुळे किंवा इतर कारणांमुळे स्वतःला वेगळे ठेवण्यासाठी जागेची समस्या असते. अशावेळी गोएअरची ही सुविधा फायदेशीर ठरू शकते. (हेही वाचा: Air India च्या कर्मचाऱ्यांना झटका; कंपनी निवडक लोकांना विना पगार पाच वर्षांपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवणार)

दरम्यान, गोएअरने आपल्या 40 टक्के कर्मचार्‍यांना पगार दिला आहे. उर्वरित लोकांचा पगार हा ग्रेड आणि डिफर्डच्या आधारे दिला जाईल असे, कंपनीचे प्रवर्तक नुस्ली वाडिया आणि जेह वाडिया यांनी आपल्या कर्मचार्‍यांना पत्रात ही माहिती दिली आहे. कंपनीतील कर्मचार्‍यांपैकी 40 टक्के म्हणजे 2,500 कर्मचार्‍यांना पगार मिळाला आहे. कोरोना विषाणूमुळे परिस्थिती बिघडल्यामुळे विमान कंपनीला अनेक कर्मचार्‍यांना वेतनाशिवाय तात्पुरत्या रजेवर पाठवावे लागले आहे. यासह एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विमान कंपनीतून कोणालाही काढून टाकण्यात आले नाही.