"Ghatis Would Not Be Preferred": गोव्यामध्ये यापुढे भुमीपुत्रांना प्राधान्य दिले जाणार असून, आगमी काळात समुद्र किनारपट्टी स्वच्छता, पर्यटन आदी कामांसंदर्भातील सर्व कंत्राटे देण्यासाठी स्थानिकांना प्राधान्य दिले जाणार नाही. या सर्व प्रक्रियेतून 'घाटी' (Ghati) लोकांना दूर ठेवले जाईल, असे वक्तव्य गोवा राज्याचे पर्यटनमंत्री (Goa Tourism Minister) मनोहर आजगावकर ( Manohar Ajgaonkar) यांनी केले आहे. दरम्यान, मंत्री आजगावर यांनी प्रामुख्याने उल्लेख केलेल्या 'घाटी' या शब्दाला अनेकांनी विरोध दर्शवला. त्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत आपण 'घाटी' हा शब्द केवळ डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांबाबत केला असल्याचे सांगितले.
आजगावकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, यापुढे कोणतेही सरकारी कंत्राट, नोकरी देताना 'घाटी' (बाहेरुन आलेल्या) लोकांचा विचार केला जाणार नाही. तर, त्यासाठी केवळ गोव्यातील स्थानिकांनाच प्राधान्य दिले जाईल. आगामी काळात समुद्र किनारा सफाई मोहीम सरकार हाती घेत आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या नोकऱ्या आणि कामाचे कंत्राट याबाबत आजगावकर बोलत होते. दरम्यान, 'घाटी' याशब्दाबाबत बोलताना आजगावकर म्हणाले 'घाटी' हा शब्द वाईट आहे. खासकरुन तो डोंगरात राहणाऱ्या लोकांसाठी वापरला जातो. (हेही वाचा, नाकात ड्रीप असताना ही गोवा मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडून पुलाची पाहणी)
दरम्यान, गोव्यात 'घाटी' हा शब्द खास करुन मराठी आणि कोकणी लोकांसाठी वापरला जातो. जे नोकरी आणि कामधंद्यानिमित्त स्थलांतरीत झाले आहेत. 2017 मध्ये जिप्सी जमातींच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीतून हुसकून लावण्याबात मंत्री आजगावकर यांनी 2017मध्ये विधान केले होते. त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती. याही वेळी 'घाटी' या शब्दावरुन मंत्री आजगावकर अडचणीत येण्याची शक्यता आहे.