गोवा मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (फोटो सौजन्य- ANI)

Goa: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) 14 ऑक्टोंबर रोजी दिल्लीतल्या रुग्णालयातून उपचार घेऊन गोव्यामध्ये परतले होते. तेव्हा पासून पर्रिकर यांची स्थिती सुद्धा खालावलेली होती. मात्र कित्येक महिन्याच्या कालावधीनंत पर्रिकरांनी मांडवी येथील पुलाची पाहाणी करताना दिसून आले. त्यावेळी त्यांच्या नाकात ड्रीप असल्याचे दिसून आले.

विरोधी पक्ष काँग्रेस आणि स्वयंसेवी संघटनांनी मुख्यमंत्री आजारपणाचे कारण देत प्रशासन ठप्प झाल्याचा आरोप केला होता. तर दुसरीकडे पर्रिकर यांना मुख्यमंत्रीपद सोपवावे अशी मागणी केली जात होती. यावेळी पर्रिकर यांच्या सोबत केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) दिसून आले होते.

तर सोशल मिडियावर पर्रिकरांचे हे फोटो व्हायरल झाले असून एका बाजूला त्यांच्या प्रकृतीवरुन दुख व्यक्त केले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला या फोटोमुळे त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे.