Coronavirus: गोव्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यासह काही नियम शिथील करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी- मुख्यमंत्री प्रमोद सावंत
CM Pramod Sawant (Photo Credits-ANI)

देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी गोवा राज्य हे कोरोनामुक्त झाल्याने ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आले होते. परंतु गोव्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत गोव्यात 30 हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून त्यांनी विविध ठिकाणांहून प्रवास केल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच गोव्यात आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्यात यावा अशी मागणी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच लॉकडाऊन जरी वाढवला तरीही काही नियम शिथील करण्यात यावेत असे ही गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

प्रमोद सावंत यांनी गोव्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता यापूर्वी पासूनच लॉकडाऊनच्या नियमांचे वेळोवेळी पालन केल्याचे पहायला मिळाले आहेत. तर आता सुद्धा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. परंतु काही नियम शिथील करण्यात यावेत असे ही प्रमोद सावंत यांचे म्हणणे आहे. त्यानुसार रेस्टॉरंट सुरु करण्यात येणार असून तेथे सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करण्यासोबत 50 टक्के उपस्थिती अनिवार्य असणार आहे. त्याचसोबत काही जणांनी जिम सुरु करण्यात यावेत अशी सुद्धा मागणी करत आहेत.(Coronavirus: कोरोना विषाणू संकटाशी लढण्यासाठी भारतातील ‘ही’ चार शहरे ठरली रोल मॉडेल; रुग्णांची संख्या व मृत्युदर आणले नियंत्रणात)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी असे सांगितले की, "गोवा राज्य कोरोना मुक्त आहे त्यामुळे येथे स्थानिक पर्यटक येऊ शकतील. मात्र परदेशी पर्यटनास थोडा वेळ लागेल. पण तेही लवकरच सुरु करणयाचा प्रयत्न करु". सध्याची स्थिती जास्त काळ राहणार नाही असेही ते म्हणाले होते. तर भारतामधील एकूणच कोरोनाची परिस्थिती पाहता बाधितांचा आकडा 165799 वर पोहचला असून 4706 जणांचा बळी गेला आहे. तर 89987 जणांवर अद्याप उपचार सुरु असून 71106 जणांची प्रकृती सुधारली आहे.