Sexual Assault Case Against Tarun Tejpal: गोवा सत्र न्यायालयाकडून तेहलका चे माजी संपादक तरूण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता
Tarun Tejpal | Photo Credits: Twitter/ANI

तहलका मासिकाचे (Tehelka Magazine) माजी एडिटर इन चीफ (Former Editor-in-Chief‌‌) तरूण तेजपाल (Tarun Tejpal) यांच्यावर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमधून गोवा सत्र न्यायालयाने (Goa Session Court)  आज त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. कोर्टाकडून हा निकाल 27 एप्रिलला येणं अपेक्षित होते मात्र तो 12 मेपर्‍यंत पुढे ढकलण्यात आला आहे. नंतर 19 मे ही नवी तारीख देण्यात आली होती. सध्या कोरोना संकटामुळे कर्मचारी संख्या कमी असल्याने निकाल पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

तरूण तेजपाल यांच्यावर गोव्यात 2013 साली त्यांच्या मासिकाच्या एका कार्यक्रमामध्ये त्याच्याकडून महिला सहकारी सोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे आरोप लावण्यात आले होते. नंतर 30 नोव्हेंबर 2013 लाच त्यांना अटकही झाली होती. मात्र नंतर 2012 साली मे महिन्यात त्यांची जामिनावर सुटका झाली होती. तरूण तेजपाल यांनी त्यांच्यावर झालेले आरोप नाकारले आहेत. दरम्यान त्यांच्यावर IPC 341,342,354, 354-A ,354-B,376(2),376(2) अंतर्गत गुन्हा दाखल होता. ही कलमं लैंगिक अत्याचार, बलात्काराची आहेत.

ANI Tweet

ऑगस्ट महिन्यात कोर्टाने त्यांच्यावरील आरोप रद्द करण्याची याचिका फेटाळत पुढील सहा महिन्यात तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.