प्रत्येक मुलीच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र पोलीस कर्मचारी तैनात करु शकत नाही, गोव्याच्या मंत्र्यांचे विधान
Goa Minister Govind Gaude. (Photo Credits: Twitter)

गोव्याचे कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गौडे यांनी शुक्रवारी असे म्हटले आहे की, राज्यात प्रत्येक मुलीच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र पोलीस कर्मचारी तैनात करणे शक्य नाही आहे. गौडे यांनी राज्य विधानसभेच्या सुरु असलेल्या पावसाळी सत्रादरम्यान असे म्हटले की, समस्या अशी आहे की जर एखाद्या व्यक्ती, मुलीसाठी पोलीस कर्मचारी तैनात केला गेला तर आम्हाला किती पोलिसांची गरज भासेल? सरकार जबाबदारी पासून पळ काढत नाही आहे. सरकार रक्षा करत आहे. सरकार लोकांच्या सोबत आहे.(Goa Beach Rape Case: बीच वर तुमची मुल रात्री का फिरतात याचा विचार पालकांनी केला पाहिजे- प्रमोद सावंत)

गौडे हे भाजपच्या नेतृत्वाखालील गठबंधन सरकारचे समर्थन करणारे ऐकटेच निर्दलिय आमदार आहेत. त्यांनी असे ही म्हटले की, अल्पवयीन मुलांच्या पालकांनी आणि सरकारकडून घेण्यात येणारी काळजी ही एक संयुक्त जबाबदारी आहे. तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुद्धा असे म्हटले आहे की, पालकांची जबाबदारी आहे की आपली मुले कुठे आहेत. याचा अर्थ असा नाही की, सराकर हे जबाबदाऱ्यांपासून पळ काढत आहे.(Goa 14 Years Girl Rape Case: माझ्या 'त्या' वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला - प्रमोद सावंत, 14 वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण)

गौडे यांनी पुढे असे म्हटले की, मुख्यमंत्र्यांनी याबद्दल आधीच स्पष्ट केले आहे. पालक असल्यांच्या नात्याने त्यांनी आपल्या मुलांकडे खासकरुन लक्ष दिले पाहिजे की ते नक्की कुठे आहेत. विरोधी पक्षांने केलेल्या आपल्या टीकेवरुन मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी असे म्हटले गहोते. बुधवारी विधानसभेचे पावसाळी अधिवेशनादरम्यानच्या एका चर्चेत सावंत यांनी असे म्हटले की, पालकांना आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. त्यांची मुल रात्र झाल्यानंतर बीचवर का फिरत असतात. 24 जुलैच्या रात्री दक्षिण गोव्यातील कोलवा बीचवर दोन अल्पवयीन मुलींसोबत कथित रुपात लैंगिक अत्याचार करण्यात आले. गुन्ह्याप्रकरणी एका कर्मचाऱ्यासह चार लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.