Goa Beach Rape Case: बीच वर तुमची मुल रात्री का फिरतात याचा विचार पालकांनी केला पाहिजे- प्रमोद सावंत
CM Pramod Sawant (Photo Credits-ANI)

Goa Beach Rape Case:  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी असे म्हटले आहे की, अल्पवयीन मुलांच्या पालकांना आत्मपरिक्षण करण्याची खरंच गरज आहे. कारण त्यांची मुलं रात्रीच्या वेळी बीचवर का फिरतात याचा विचार केला पाहिजे. हे उत्तर प्रमोद सावंत यांनी राज्यात झालेल्या बलात्काराच्या घटनांवर विरोधकांनी जेव्हा आरोप लावले तेव्हा त्यांनी दिले आहे. रिपोर्टमधून असे समोर आले आहे की, विरोधकांनी 24 जुलैच्या रात्री दक्षिण गोव्यातील लोकप्रिय कोलवा समुद्र किनारी दोन अल्पवयीन मुलींवर कथित रुपात बलात्कारानंतर गोव्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर आरोप लावण्याता आले आहेत. याच दरम्यान विरोधकांनी मुख्यमंत्र्यांनी बलात्काराच्या मुद्द्यावरुन लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

राज्य सभेचे सुरु असलेल्या मान्सून सत्राच्या दरम्ायन ध्यानाकर्षण प्रस्ताव मांडला गेला. सावंत यांनी असे म्हटले की, 10 मुल समुद्राच्या बीचवर एक पार्टीसाठी आले होते. त्यामधील सहाजण परतले. पण उर्वरित चार आणि दोन मुल आणि मुलींचा समावेश असून ते पूर्ण रात्र बीचवरच होते. मुख्यमंत्र्यांनी उत्तरात असे म्हटले की, जेव्हा 14 वर्षाची मुलगी बीचवर रात्री आपला वेळ घालवते तेव्हा त्यांच्या पालकांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे. त्यांनी लक्ष ठेवले पाहिजे.(Cyber Crime: महिलांविरोधात गेल्या तीन वर्षात 36,463 सायबर गुन्ह्याची नोंद)

मुख्यमंत्र्यांनी पुढे असे म्हटले की, ही आपली जबाबदारी आहे. हे फक्त अशासाठी की, मुल आपल्या पालकांचे ऐकत नाही आहे. आम्ही संपूर्ण जबाबदारी पोलिसांवर सोडू शकत नाही. कथित बलात्काराच्या घटनेप्रकरणी चार जण अनुक्रमे आसिफ हटेली, राजेश माने, गजाचंद चिंचकर आणि नितीन यब्बल यांना अटक केली आहे.