महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सायबर गुन्हेगारीच्या (Cyber Crime) क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगारीत पुरुषांसह महिलांचाही समावेश असल्याचे अहवालातून समोर आले आहे. देशात 2017 ते 2019 पर्यंत महिलांविरोधात सायबर गुन्हेगारीची 36 हजार 463 गुन्हे दाखल झाले आहेत. तर, मुलांविरोधात 625 प्रकरणांची नोंदवले गेले आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारने लोकसभेत माहिती दिली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालातील आकडेवारीचा हवाला देत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत धरमवीर सिंग यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना हे सांगितले. सोशल मीडियात गैरकारभाराच्या नावाखाली नग्नता आणि अश्लीलता रोखण्यासाठी सरकारने काही पावले उचलली आहेत का? असा प्रश्न लोकसभेच्या सदस्यांनी विचारला होता.
चंद्रशेखर म्हणाले की पोलिस आणि सार्वजनिक सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे. अशा बाबींवरील तक्रारींवर राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या संबंधित कायद्यांचे पालन अधिकारी करतात. अशा प्रकरणात लोकांविरूद्ध काय कारवाई केली गेली असे विचारले असता ते म्हणाले की या मंत्रालयाकडे यासंबंधी कोणताही तपशील उपलब्ध नाही. हे देखील वाचा- Unclaimed Deposit In PSB: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे तब्बल 16,596 कोटी रुपयांच्या बेवारस ठेवी; भागवत कराड यांची संसदेत माहिती
मंत्री म्हणाले की, नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालात आणि आकडेवारीनुसार, मुलांवर सायबर गुन्ह्यांच्या 2017, 2018 मध्ये 88 हजार 232 आणि 2019 मध्ये 305 प्रकरणे नोंदवली गेली आहे. याच काळात महिलांविरोधात क्रमश: 11 हजार 18, 10 हजार 686 आणि 14 हजार 759 गुन्हे दाखल झाले आहेत.