Gay Man Commits Suicide: ब्रेकअपनंतर गे तरुणाची आत्महत्या; एका मुलीसाठी बॉयफ्रेंडने 3 वर्षांचे नाते तोडल्याचा आरोप   
Representational Image (Photo Credits: File Image)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूरमध्ये (Indore) एका गे (Gay) तरुणाने आत्महत्या केली आहे. या तरुणाने प्रियकरावर प्रेमात फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली असून त्यात मृताने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. या घटनेच्या तब्बल 80 दिवसांनंतर पोलिसांनी प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मृताने दोन पानी सुसाईड नोट लिहिली होती, ज्यात त्याने आपल्या प्रियकरावर फसवणुकीचा आरोप केला आहे.

त्याने लिहिले आहे की, ‘आपल्या बॉयफ्रेंडचे गेले 3 वर्षे आपल्याशी रिलेशन होते. परंतु नंतर त्याचे मन भरले आणि आपल्याला मुलीसोबत राहायचे आहे असे तो म्हणू लागला. त्याने आपल्यासोबतचे नाते संपायच्या धमक्या दिल्या तसेच टॉर्चरही केले. याला कंटाळून आपण आत्महत्या करत आहे.’ सध्या पोलिसांनी प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्याला अद्याप ताब्यात घेण्यात आले नाही.

सुसाईड नोटमध्ये असेही म्हटले आहे की, ‘आरोपी बॉयफ्रेंड अनेक कारणे सांगून तीन वर्षे माझ्या घरी राहिला. यादरम्यान त्याने माझ्यावर शारीरिक अत्याचार केले. माझ्याबाबतीत त्याचे मन भरल्यावर आपल्याला मुलीसोबत राहायचे आहे असे तो म्हणू लागला. यापूर्वीही त्याने एका मुलीची फसवणूक केली होती. दोन महिने त्याने माझा छळ केला. एके रात्री माझे त्याच्याशी भांडण झाले त्यावेळी त्याने मला खूप मारले.’ (हेही वाचा: दोस्तावरील प्रेमासाठी लिंग बदलून गड्याची झाला बाई, आता प्रियकरच म्हणतो नाही, पोलिसांत तक्रार दाखल)

मृताने आपल्या सुसाईड नोटमध्ये माहिती दिली आहे की, 'बॉयफ्रेंडने माझ्याशी लग्नही केले. मात्र एका मुलीच्या प्रेमप्रकरणात त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. अशा व्यक्तीला कधीही सोडू नका. आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तो अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे.’ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुणांमध्ये चांगली मैत्री होती. दोघेही जवळपास तीन वर्षे एकमेकांसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. यादरम्यान प्रियकराची दुसऱ्या मुलीशी मैत्री झाली. त्यानंतर त्याने प्रियकर मृतकासोबत संबंध संपवण्याचा प्रयत्न केला. यावरून दोघांमध्ये बाचाबाचीही झाली व त्या रागातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.